नाशिक विमानतळाचा प्रश्न चिघळणार ? साधुसंतांची मागणी खोडसाळ, साधुसंतांचा बोलविता पोपट कोण ?त्याचा पर्दाफाश करावा : तानसेन ननावरे
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.9158417131 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 110447 + (१ लाख १० ह.४४७ पेक्षा जास्त )

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मुंबई, नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे ,या मागणीसाठी गेल्या तीन वर्षापासून आंदोलन सुरू आहे .सदर मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्वता मान्यता देण्याचे कबूल करून शासकीय ठराव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु करोना महामारीमुळे तो ठराव उद्धव ठाकरे सरकारने पारित केला नाही. सत्तेतून पायउतार होता होता उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाचा व संभाजीनगर विमानतळाचा नामांतराचा शासकीय ठराव संमत केला .नाशिक विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित ठेवला.
आता सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असता नाशिक विमानतळाच्या मागणीने जोर धरला, याबाबत नाशिक विमानतळ नामांतर
कृती समितीचे संयोजक तानसेन ननावरे ,आनंदराव निरभवणे ,नितीन मोरे ,पत्रकार महादू पवार, श्याम वाडकर ,सुखदेव दांडगे इत्यादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्याचे आश्वासन दिले, त्यातच आजतागायत पाठपुरावा सुरू आहे. नाशिक विमानतळाच्या नामांतराचा तिढा सुटण्याच्या दृष्टीक्षेपात आला असता काही तथागतीत साधूसंतांनी नाशिक विमानतळाला रामायण कालीन *जटायू* यांचे नाव देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे वृत्त वाहिन्यांवर आले आहे. साधू संतांची सदर मागणी खोडसाळ व समाजात दुही निर्माण करणारी आहे.
रामायण कालीन *जटायू* विषयी नितांत आदर आहे ,परंतु त्यांचे नाव नाशिक विमानतळाला देणे अनाठायी तसेच गैर आहे. रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेकडे प्रयाण करताना *जटायू* रावणाला अडवून त्याच्याशी युद्ध केले, त्यामध्येच तो जखमी होऊन मृत्यू पावला .प्राण सोडण्यापूर्वी त्याने प्रभू रामचंद्रला रावणाने सीतेचे हरण केल्याचे रामाला सांगून प्राण सोडला. हुतात्मे स्वीकारले, त्या जटायूचे नितांत आदर व्यक्त करीत आहोत.
जटायूच्या नावाची नाशिक विमानतळाला मागणी करणाऱ्या साधुसंतांचा बोलविता पोपट ( धनी ) कोण आहे ? त्याचा पर्दाफाश त्वरित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत असून यावरून नाशिक विमानतळचा प्रश्न चिघळण्याची शक्यता असून संघर्ष तीव्र होण्याचा इशारा देण्यात येत आहे. देशात दलित मागासवर्गीयांना संघर्षाशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडत नाही, हे स्पष्ट होते ,यावरून नाशिक विमानतळाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता असून संघर्ष तीव्र होण्याचा इशारा देत आहे.केंद्र व राज्य सरकारने याबाबतीत त्वरित निर्णय घेऊन हा तिढा सोडविण्याचा देशात आव्हान करण्यात येत असल्याचे नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीचे संयोजक तानसेन उर्फ अविनाश ननावरे यांनी केले असून कोणास काही अडचण ,शंका असल्यास 8169218015 ह्या मो.नंबर वरती संपर्क करण्याचे आवाहनही ननावरे यांनी केले आहे.