देवळा बस स्थानकाच्या आवारातील शौचालयामुळे महिलांना व्हावे लागते अपमानीत, संबंधितांचा हलगर्जीपणा

0
75

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे एस टी बसस्टँड चे काम गेल्या अनेक महिन्यापासून प्रगतीपथावर सुरू आहे.जुना बसस्टँड सुद्धा चांगलाच काँक्रीट मध्ये बांधलेला होता त्यावेळी महिला आणि पुरुष यांचे साठी स्वतंत्र शौचालय बांधलेले होते.ते सर्व पाडून नवीन बसस्थानक होऊ पहात आहे.हे जरी चांगले आहे परंतु वाईट सुद्धा वाटते आहे ती मोठी शोकांतिका महिला वर्गास सहन करावे लागते आहे.बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रगती पथावर असेल परंतु संबंधित बांधकम कॉन्ट्रॅक्टरने महिलांचे सोईचे दृष्टीने तात्पुरते का होईना भक्कम पणे पाऊले उचलण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून महिलांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत असलयाने महिलांमध्ये संतापाची लाट उसळत असून ह्या गोष्टीचे गांभीर्य येवढ्या दिवसापासून तर आजपावेतो संबंधित कॉन्ट्रॅक्टर च्या किंवा बस स्थानक कंट्रोलर यांच्या लक्षात का येत नाही अशी चर्चा सध्या बसस्थानकाच्या आवारात चर्चिली जात आहे.मनस्ताप सहन करण्याची बाब म्हणजे बसस्थानकाचे काम काहीसे जोरात चालू आहे परंतु महिलांसाठी तात्पुरते का होईना शौचालयाची सुविधा केलेली नाही जी सुविधा केलेली आहे ती सुविधा लेडीज साठी की पुरुषां साठी आहे याबाबत अनेक महिला आणि पुरुषांमध्ये संभ्रम निर्माण होतो.त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि बस स्थानकातील कंट्रोलर यांचा बेजबाबदार आणि हलगर्जी पणा दिसून येत असून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी त्या शौचालयावर किंवा शौचालयाच्या पत्र्यावर महिला किंवा पुरुष असे बोध चिन्ह किंवा पोस्टर काहीच लावलेले नाही त्यामुळे हे शौचालय नेमके कोणासाठी ? हा प्रश्न उपस्थित होतो तर बऱ्याचदा पुरुष मंडळी वरील शौचालयाचा आसरा घेतात त्यामुळे महिलांना अपमान सहन करून परतावे लागत असते याचे गांभीर्य संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे घेतील का असा सवाल ही येथे नागरिकात व्यक्त केला जात आहे.तर सर्वच गोष्टींचे भान ठेऊन बांधकामाची तयारी करावी असेही संतप्त प्रवाशांनी महाराष्ट्र न्यूज बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.तर अनेक प्रवाशांनी आणि देवळा येथील सुज्ञ नागरिकांनी महिलांसाठी तात्पुरते का होईना स्वतंत्र शौचालय उभारून महिला पोस्टर लाऊन महिलांना चा सन्मान जतन करावा अशीही मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here