कवी अनिकेत मशिदकर यांना २०२३ चा सर्वद फाऊंडेशन तर्फे ” कवी पुरस्कार ” जाहीर

0
111

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.9158417131. महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 109783 +                                                           मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव येथे राहणाऱ्या युवा कवी अनिकेत मशिदकर उर्फ अनिकेत सागर यांना 2023 चा सर्वद फाउंडेशन तर्फे कवी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी होणार असून अनिकेत मशिदकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अनिकेत हे नाशिक मधील मालेगाव तालुक्यात राहणारे असून त्यांचे लिखाण इयत्ता आठवी पासून सुरू झाले. अनेक पुस्तक मासिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात व अनेक हिंदी मराठी व उर्दू वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांना गझल कविता व लेख लिहिण्याची आवड आहे. सध्या कान्हा या विषयावर अनेक कविता त्यांच्या लिहून झाल्या आहेत व प्रेम दर्पण हा त्यांचा हिंदी काव्यसंग्रह ही प्रकाशित झालेला आहे. त्यांचे फेसबुक पेजही आहे त्या पेजचे नाव सेन्टीमेंट्स ऑफ कान्हाजी हे आहे. ते गीतकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे गाणे ही युट्युब ला रिलीज झालेले आहेत व आगामी गाण्यांची तयारीही करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here