September 25, 2023

माळवाडीचा “तो ” अवलीया पैशा मागे न धावता माणुसकीचा ठेवा जतन करून समाजात आदर्श ठरलाय !

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.9158417131.    महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 109575 + ( एक लाख ९ ह.५७५ पेक्षा अधिक)                                                   देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  आज आपण नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी  येथील एका अवलीया बाबत जाणुन घेवु या.
दिनांक ८ डिसेंबर त्यांच्या ऊभयतांचा लग्नाचा वाढदिवस. आणि ९ डिसेंबर रोजी त्यांचा जन्मदिन.
मिञ हो हा अवलीया म्हणजे आपल्या सर्वांचा सुपरीचीत असणारा राम केटर्सचे सर्वेसर्वा श्री.दिनकरराव भदाणे.प्रथम त्या ऊभयतांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी आभाळभर शुभेच्छा.
मिञ एक हेवा वाटावा असे व्यक्तिमत्त्व आणि समाजातील सुशिक्षित मंडळींनी आणि त्यांच्याच नात्यातील छोटू नामक व्यक्तीने सुद्धा एक आदर्श घ्यावा असं ध्येयवादी व्यक्तिमत्त्व. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रसंगी पडेल ते काम करण्याची वृत्ती.त्यामुळे कामाची कधी लाज बाळगली नाही.आणि विशेष म्हणजे दोन भाऊ पण दोघांचं छान जमतं.अगदी हेवा वाटावा असे राम- लक्ष्मणा सारखे बंधु. ते म्हणजे दावल भदाणे.त्यांचे देवळा येथील स्व.विजयाताई शांताराम आहेर शाॅपींग काॅम्पलेक्स मध्ये अद्ययावत असे सलुनचे दुकान आहे.
दिनकररावची दिनचर्या जरा वेगळी होती.स्थिरस्थावर होता येत नव्हते काय ऊद्योग करावा हा यक्ष प्रश्न ऊभा. अशातच २०१७ बाहेरुन कुणीतरी चार खापराचे मांडे ( पुरणपोळी ) बनवण्याची ऑर्डर दिली.तेथुन मग सुरुवात झाली राम केटर्स व पुरणपोळी सेंटरची.आज दिनकरराव व परीवाराला कामाच्या व्यापामुळे उसंत मिळत नाही. अतिशय सुग्रास असे सुरुची भोजन बनवण्याची किमया साधली.जिभेवर चटपटीत खमंग भोजणाची चव रेंगाळतांना मन तृप्त होवुन जाते.दिनकरराव यांनी व्यवसाय असा निवडला की आर्थिक हातभार ही लागला आणि सुरुची भोजनामुळे तृप्त झालेल्यांची दुवा ही मिळते.
पुरण पोळी साठी नुसते पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून गुजरात, मध्यप्रदेश पर्यंत राम केटर्सच्या पुरणपोळीचे गगनभरारी घेतली.ह्या अनमोल कामात त्यांच्या अर्धागिणींचा सिंहाचा वाटा आहे.आणि दावल भाऊ सुध्दा आपला सलूनचा व्यवसाय सांभाळून सिझनमध्ये दिनकररावला मदतीसाठी झोकून देतात.अतिशय नम्र, शालीन,कुटुंबवत्सल असा प्रेमळ हा परीवार आहे.त्यात वारकरी संप्रदायाची आवड.
कामधंदा नाही म्हणून काय करु या विचारातच तरुण वाट चुकतात आणि वाममार्गाला लागतात पण असे संघर्षशील व्यक्तिमत्त्व बघीतले तर आपल्यालाही आपला जिवनाचा मार्ग सापडतो.दिनकररावने आज पुरण पोळी बनविण्याचा व्यवसाय जरी निवडला असला पोळीतील सुरुची सर्वदूर पसरली असली तरी त्यांचे पाय आजही जमिनीवर कायम आहेत. आजच्याअत्यंत महागाईच्या जमान्यात सुद्धा पैशांकडे न पाहता माणुसकी जपावी म्हणून दिनकरराव आणि दावल बंधू ग्राहकास परवडेल अशा माफक दरात ” पोळी ” बनून अगदी घरपोच सेवा देत असतात.यातच त्यांचे माणुसकीतील माणूस पण दिसून येते.नाहीतर त्यांचाच नात्याने बंधू असलेला छोटू याच्या भावात आणि वागणुकीत सुद्धा मोठी तफावत असते त्यामुळे त्याचा पोळी व्यवसाय आहे तिथेच आहे त्याने दिनकर आणि दावल बंधू चे ज्ञान त्यांची माणुसकी यातील धडे त्या छोटू ने आत्मसात करणे गरजेचे आहे.नाहीतर गर्वाचे घर खाली होण्यास वेळ लागणार नाही.असो.
भदाणे परीवाराला आमच्या माळवाडी येथील पवार परिवाराकडून तसेच देवळा येथील शिंदे परीवाराकडून  खूपखूप शुभेच्छा.आपला व्यवसाय सातासमुद्रापार जावा ह्याच आमच्या निर्मळ मनाच्या पविञ शुभेच्छा.
🌹पुष्पाजंली 🌹
भारत पवार , मुख्य संपादक मो.9158417131 आणि  सुनील ( जिभाऊ) शिंदेसर,
शिंदेवाडी, देवळा.
महाराष्ट्र न्यूज – वाचक संख्या : 109575 + ( १ लाख ९ ह.५७५ पेक्षा जास्त वाचक ) * प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी वरील मोबाईल वरती संपर्क करावा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.