
भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.9158417131. मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : रघुनाथ कुंवर , उपसंपादक : धुळे जिल्ह्यातील आर्वी येथे थोरपराक्रमी यशवंतराव होळकर यांची जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे गावातून सहवांद्य मिरवणूक करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शूर पराक्रमी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी वक्त्यांनी यशवंतराव होळकर यांनी केलेल्या पराक्रम बद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रोहन कुवर, (उपजिल्हाधिकारी पालघर मुंबई) यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. यावेळी,
श्री. कुवर रावसाहेब (निवृत्त नायब तहसीलदार तथा सामाजिक) कार्यकर्ते, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष धनश्री ताई आजगे. धनगर समाज महिला प्रदेश अध्यक्ष, श्री. अण्णासाहेब खेरनार, धनगर समाज प्रदेश अध्यक्ष, शिवसेनेचे संपर्कप्रमुख माननीय हिलाल अण्णा माळी, कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी नथू पाटील, धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र धुळे तालुका उपाध्यक्ष, माजी सरपंच किशोर देवरे, उपसरपंच विश्वनाथ सोनवणे, सोसायटी चेअरमन नानाभाऊ शिंदे, श्री. राजीव हाके सर, मौर्य क्रांती खानदेश अध्यक्ष, किरण मासुळे सर अशोक अण्णा आजगे, शांताराम माऊली, चंद्रकलाताई मासुळे, योगिता ताई पाटील, प्रकाश अण्णा खरात, नामदेव चोपडे, वाल्मीक गर्दे, योगेश गर्दे, युवराज हाके, बापू गर्दे, अकबर पिंजारी, ज्ञानेश्वर पाटील, अरुण अहिरे, नाना गुरव व ग्रामस्थ यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.
