जोतिबा म्हणजे जोतणारा” बा ” ज्योतिबा नव्हे : रविराज सोनार

0
53

भारत पवार : मुख्य संपादक : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. 9158417131.महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 108231+.                                                        मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  नव्या शब्दांसाठी आपण कायम स्वागतशील असलं पाहिजे, मग ते नवे शब्द भाषेत अगदी नव्याने तयार होणारे असोत की इतर वा परक्या भाषेतील असोत. आपल्या जुन्या पारंपरिक ग्रामीण शेतीविषयक शब्द आज मोठ्या प्रमाणात हरवू लागले आहेत. त्या शब्दांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, माध्यमतज्ज्ञ व साहित्याचे अभ्यासक रविराज सोनार यांनी येथे केले.
येथील कर्मवीर या. ना. जाधव उच्च माध्यमिक विद्यालयात ते बोलत होते.
मालेगाव मराठी साहित्य संघ व महात्मा जोतीबा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ते बोलत होते. या वेळी प्राचार्य के.जी. मोरे, प्रा अनिल महाजन, पर्यवेक्षक हर्षिता अहिरे, प्रा् बेडसे- निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक एस के पवार होते.
वैज्ञानिक भाषा शिक्षणाचा विचार केला तर महात्मा फुले यांचं पाहिलं नाव जोतिबा आहे.
जोतिबा हा शब्द बनलाय जोतणे म्हणजे नांगरने या शेती संस्कृतीच्या आधार कृतीतून. जोतिबा म्हणजे जोतणारा बा …पूर्वज ….म्हणून योग्य लिखाण “महात्मा जोतिबा फुले” असं आहे महात्मा ज्योतिबा फुले नाही!! जोतं, जोतनं, जोत, जोती, जू…..ज्याला य जोडलेला नाही असे शब्द शेती संस्कृतीची ओळख आहेत. त्याची उपज तिथून आहे. ज्योत हा शब्द शेती संस्कृतीचा नाही. म्हणून जोतिबा हा शब्द बरोबर आहे. म्हणूनच बैलांच्या सावळा, शेतीची मेर म्हणजे काय, वगैरे आपल्याला असं कोणाला कधी विचारावं लागू नये, असेही श्री सोनार यांनी यावेळी सांगितले.
टी. जे जगताप यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. यावेळी श्री सोनार यांनी मालेगावचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहासही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here