वडनेर खाकुर्डी परिसरातील अवैध वाळूवाहतूक किंवा अवैध धंदे चालू असतील तर नागरिकांनी पोलिसांना कळवा : देवेंद्र शिंदे
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क मो. 9158417131 आमच्या चॅनलची वाचक संख्या 108096 + वडनेर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पो स्टे हद्दीतील सर्व अवैध धंदे पोलिसांनी यापूर्वीच धाड सत्र राबून कारवाया करून बंद केले आहेत.परंतु जर कुठे असे अवैध धंदे चोरून लपून सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अवैध व्यवसायांचा समूळ नाश करण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून आपली मदत खूप महत्त्वाची आहे.
तरी या संदेशद्वारे आम्ही आपणास सांगू इच्छितो की,आपल्या गावात किंवा परिसरात गावठी दारू,देशी दारू, विदेशी दारू याची विक्री होत असेल किंवा दारू गाळण्यासाठी भट्ट्या लावल्या जात असतील किंवा अवैध वाळू वाहतूक होत असेल तर त्याबाबत आमचा मो.क्र. –
9552542882 यावर संपर्क करून आम्हाला ती माहिती द्यावी व आम्ही स्वतः संबंधित अवैध धंद्यावर कारवाई करू असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी केले आहे.
दिलेली माहिती व माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल असेही शिंदे यांनी कळविले आहे.
