पालकमंत्री ना.दादा भुसे यांच्या मतदारसंघातील मालेगाव तहसील कचेरी मागतेय नावाचं लेनं …!” नामफलकाच्या ” प्रतीक्षेत तहसील कचेरी
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक :107698 + वाचक संख्या असलेल्या महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क : मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रशासकीय कार्यालय एका छता खाली असेल तरी त्या छतांची भिंत भकास असल्या सारखेच दिसत आहेत.नाशिक जिल्ह्यातील एकमेव नियोजित जिल्हा म्हणजे मालेगावचा उल्लेख केला जात असतो.मालेगाव हे महानगर अतिसंवेदनशील शहर म्हणून प्रशासनात मोठी ओळख आहे.विशेष म्हणजे आज पर्यंतचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ह्या मालेगावने ५ ते ६ मंत्री महाराष्ट्राला जनतेच्या सेवे साठी दिले आहेत.तेव्हा पासून तर आजपर्यंत मालेगाव जिल्ह्याचे गाजर ” लोंबकळत ” ठेवले आहे.सद्याचे महाराष्ट्राचे बंदरे व खनिजकर्म तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे हे सुद्धा मालेगाव महानगरातले रहिवासी आहेत.अशा पालकमंत्र्यांच्याच गावाची तहसील कचेरी ” विनाफलकची ” उभी असून तिचे लेन च ( नाव ) हरवल्याने कचेरीची सुंदरता नष्ट झाली आहे. पालक मंत्र्यांच्या गावच्या तहसील कार्यालयाला फलक नाही अशी चर्चा नागरिकात होत आहे.त्यामुळे मात्र पालकमंत्री यांचे नाव जनता आवर्जून घेत असते.मग ते चांगल्या भावनेने की अजून कोणत्या भावनेने घेतात हे चानाक्ष वाचक वर्गास सांगणे न लगे.मात्र नाव भिंतीवर टांगल्या सारखे नागरिक घेत असतात.विशेष बाब म्हणजे मालेगाव येथील ध्वज स्तंभाचे सुद्धा काही दिवसांपूर्वी चक्क हेळसांड करण्यात आल्याची सत्यता आहे.७५ फूट उंचीचा ध्वज स्तंभ पहिल्यांदा येथील पंचायत समिती आवारात उभा केला होता.तोच स्तंभ काढून येथील तहसील कचेरी आवारात उभा केला.जर आधीच येथे उभा केला असता तर ध्वज स्तंभाची हेळसांड झाली असती का ? याचे उत्तर प्रशासनाकडे आहे काय ? अशीही चर्चा येथे होत आहे.अशा ह्या तहसील कार्यालयाला किंवा प्रांत कार्यालयाला नाम फलक नसल्या मुळे हे कार्यालय आहे की कुठले ” आश्रम ” आहे ? असे नवीन येणाऱ्या नागरिकास वाटत असते. त्यामुळे येथील तहसील कचेरी मागतेय स्वतःच्या हक्काचे ” लेन ” अर्थात नामफलक कधी बसवणार ? या प्रतीक्षेत येथील तहसील कचेरी आणि प्रांत कार्यालय सुद्धा असल्याने हे लेन दादा लावण्याचे आदेश संबंधितांना करून तहसील कचेरीस व प्रांत कार्यालयास गत वैभव प्राप्त करून द्यावेत तर येथील तहसीलदार रजेवर आहेत की काय ?, हेच कळेनासे झाले आहे त्यामुळे येथील तहसील कार्यालयात कायम तहसीलदार देऊन कामाच्या बाबतीत जनतेची होणारी परवड कायमची थांबवावी अशी मागणी प्रसिध्दी माध्यमातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा संपादक/ पत्रकार भारत पवार ,पत्रकार अनिल जाधव यांनी केली आहे. तर तहसील कार्यालयाला फलकाची असणारी प्रतीक्षा थांबाविण्यासाठी ना.भुसे यांनी याबाबत विशेष लक्ष घालून नावाची होणारी चर्चा थांबवावी असेही पत्रकार भारत पवार ,अनिल जाधव यांनी शेवटी म्हटले आहे.