खमताने येथील गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

0
64

भारत पवार :मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.मो.9158417131.                 सटाणा : कसमादे टाइम्स  महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  यशोधन शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा संचलित बागलाण तालुक्यातील गुरुकुल पब्लिक स्कूल खमताने (मिलिटरी स्कूल) येथे  संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून 26/ 11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र आहेर यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक कापडणीस सर यांनी प्रास्ताविक मांडले. संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात संविधान म्हणजे काय संविधान तयार करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती कष्ट सहन करावे लागले. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील एकूण 25 विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर जाऊन संविधानाबाबत भाषणे केली. शाळेचे एच. ओ. डी. नितीन अहिरे व वैशाली देवरे यांनी भारतीय संविधानावर विद्यार्थ्यांकडून नाटिका सादर करून घेतली. अतिशय उत्तम असा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला या कार्यक्रमास संस्था संचालिका सौ आहेर चेतनाली, सुनील सोनवणे मेजर देविदास देवरे, भाऊसाहेब निकम, हिरे रूपाली, सोनवणे रविंद्र, ह. भ. प. आनारे भालचंद्र महाराज पवार दिपाली, अहिरे शितल, देवरे मीनाक्षी, देवरे भाग्यश्री, ठाकरे मॅडम, महाजन मॅडम, व संस्थेचे इतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते संविधान वाचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here