धनगर समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वसतिगृहाची सोय करण्याचा निर्णय घेतल्याने शासनाचे आभार
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क करावा तसेच बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. 9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आर. पी.कुवर ,उपसंपादक : महाराष्ट्रातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय राज्यातील सर्व जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनेक नेत्यांनी शासनाकडे केली होती.तरीही आजपावेतो ह्या मागणी घोंगडे शासनाने भिजतेच ठेवले होते.त्याकरिता अनेकदा समाजाच्या नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला शेवटी
महाराष्ट्र शासनाने काल 29 /11/ 2022 रोजी परिपत्रक काढून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृहाची सोय करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे समाजाच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येत असून समाजाच्या वतीने ह्या निर्णयाचे महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पाठपुरावा करणाऱ्या समाज रत्नांचा पण आभार मानावा तितका थोडा गेल्या आठवड्यात धनगर समाजाच्या वतीने डॉक्टर भगवान बीर साहेब प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक यांच्या समवेत ऑनलाईन चर्चा करण्याने समाज रत्न मा. खासदार श्री.विकासजी महात्मे साहेब, श्री. बापूसाहेब हाटकर, श्री. बापूसाहेब शिंदे, श्री आर.पी. कुवर रावसाहेब (WDSO) , Ad.सौ. शितलताई चिंचोरे, श्री. अभिलाल भाऊ देवरे, श्री निंबा जाधव, श्री दादा जाधव,भादेकर रावसाहेब(WDSO), सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी ही चर्चा घडवून आणली ते श्री. ज्ञानेश्वर भाऊ परदेशी व डी. एन. धनगर सर यांच्या प्रयत्नांना हे यश आले त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार.
आपला, समाज बांधव : श्री. आर. पी. कुवर, रावसाहेब (तात्या)