मालेगाव : पी. एस. आय. राजेंद्र गोसावी यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव ,मुख्य संपादक भारत पवार यांनी दिल्या शुभेच्छा

0
76

प्रखड ,सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क करा. आपली  कोणतीही जाहिरात  किंवा बातमी असो काही सेकंदात ”   महाराष्ट्राच्या घराघरात, मनामनात ”  महाराष्ट्रभरातील वाचक संख्या : 91372 +     ” दसरा ,दीपावली जाहिराती साठी अवश्य संपर्क करा _                                             संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक / संचालक : मो.9158417131                                                                                                     मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर म्हटले तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावाजलेले हे महानगर अतिसंवेदनशील महानगर म्हणून ह्या शहराकडे पाहिले जाते. सण,उत्सव म्हंटले किंवा कोणतीही निवडणूक असो महसूल आयुक्तां पासून ,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक ह्या अधिकाऱ्यानं पासून जातीने लक्ष ह्या शहराकडे असते.मग विचार करण्या सारखी बाब म्हणजे मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक यांचे पासून तर पोलीसदादा पर्यंत ह्या महानगराच्या सुरक्षिततेची ह्या महानगरातील प्रत्येक नागरिक सुरक्षित कसा राहील ? ह्या महानगरातील वाहतूक सुरळीत कशी राहील ? याची जबाबदारी मालेगावचे सर्वच ( महिला,पुरुष) पोलीस अगदी डोळ्यात तेल घालून हि जबाबदारी पार पाडत असतात.हे खरच आहे की, मालेगाव समस्त पोलीस यंत्रणेचे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कितीही कौतुक केले ,कितीही स्वागत केले तरी ते कमीच होईल ईतके पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे ह्या संवेदनशील शहरावर उपकार आहेत.असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.अर्थात वेळ प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावणारे नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने येथील अपर पोलीस अधीक्षक खांडवी सर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्या संवेदनशील महानगरास लाभल्याने नागरिक बिन्धास्त आहेत.मग येथील वाहतूक शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सुद्धा सुरळीत वाहतूक साठी निसंकोचपणे कटिबध्द असतात.म्हणून शहरातील वाहतूक व्यवस्था आज सुरळीत असल्याचे सगळ्यांना पहावयास मिळते.असेच येथील वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी ( भाऊ ) यांना नुकतीच वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ( पी. एस.आय.)म्हणून पदोन्नती देण्यात आल्याने त्यांचेवर मालेगाव महानगरातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. गोसावी यांना हा बहुमान जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते सन्मान करून देण्यात आला.राजेंद्र गोसावी यांचे विषयी थोडक्यात म्हणजे कर्तव्यनिष्ठ कॉन्स्टेबल म्हणून त्यांची ख्याती आहे.हसतमुख असणार चेहरा कोणास कुठलाही त्रास न देणारा वाहतूक शाखेचे पोलीस म्हणजे राजूभाऊ गोसावी यांचे नाव घेतले जाते.असे असूनही रिक्षा चालकांवर गोसावी यांचा दरारा मात्र कायम आहे.अशी त्यांची बंदोबस्ताची हातोटी आहे.अशा ह्या अधिकाऱ्यास गोसावी यांना अनेकांनी स्वतः त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छसह शुभेच्छा दिल्यात तर काहींनी मोबाईल द्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.तर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील सर,येथील अपर पोलीस अधीक्षक खांडवी सर,मालेगाव वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोहारे सर आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तर महाराष्ट्र न्यूज  चे मुख्य संपादक भारत पवार ,पत्रकार अनिल जाधव यांनी गोसावी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 91372 + दसरा , दीपावली जाहिराती साठी संपर्क करा. आपली जाहिरात काही सेकंदात महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात , घरातील प्रत्येकाच्या मनात.संपर्क : 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here