
प्रखड,सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.आणि अवघ्या काही सेकंदात पोहोचा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मना मनात.महाराष्ट्र भरातील वाचक संख्या : 91372 +
दसरा , दीपावली जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मुंबईच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेच बोलणार असल्याचे महत्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिल्याने राज्य भरातील तमाम शिवसैनिकांत जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले आहे.यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ह्या विवंचनेत उद्धव ठाकरे शिवसैनिक पडला होता.गेल्या दीड महिन्यापासून याविषयी महाराष्ट्रातील तमाम जनतेची उत्सुकता टांगली गेली होती.शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोरी करणारे शिंदे गटाच्या वतीने दंड थोपटण्यात आले होते. दोघा गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज करून परवानगी मागण्यात आली होती.महापालिकेने महिनाभर विचारात घालून सुद्धा काहीही निर्णय दिला नाही.म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटाने हायकोर्टात घाव घेतल्याने महापालिकेने दोन्ही गटांचे अर्ज निकाली काढले.मात्र न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.शिवाजी पार्कवर आता उद्धव ठाकरे आता खणखणीत नाने वाजवतील म्हणजेच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे च बोलतील असा निर्णय दिला.तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.मुंबई उच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणी चर्चेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट शिवसेना यांच्या वतीने युक्तीवादाची फटकेबाजी अगदी जंगी झाली.या सुनावणीत न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरे यांना 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वप्रथम अर्ज न्यायालयात दिल्याने त्याचा विचार न्यायालयाने केला.त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात जाहीर भाषण करणार आहेत.उद्धव ठाकरे यांचा हा मोठाच विजय असल्याने शिवसैनकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून व पेढा वाटप करून मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि आहे. सत्याचा विजय होतोच अशी प्रतिक्रिया बागलाण तालुक्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक बागलाण,मालेगाव बाह्य आणि मध्य विधानसभा संघटक लालचंद सोनवणे यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केली.यावेळी उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण , तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे,सटाणा शहर संघटक राजन सिंग चौधरी यांचे सह सटाणा शहरातील आणि तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
