पत्रकारांच्या न्याय मागणीची खिल्ली उडविणाऱ्या मालेगाव प्रशासना विरुद्ध पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे आमरण उपोषण अटळ , कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” चा जोरदार पाठींबा

0
84

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज   संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.तसेच   आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क करा . मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : पत्रकारांच्या आत्मियेतेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने याउलट प्रताप करून डोळे असून आंधळे बनण्याचा आव आणून कानावर हात ठेऊन पत्रकारांच्या न्याय मागणीची खिल्ली च उडविली असल्याने या खिल्ली विरूध्द अखेर येथील ईमानदार आणि तळमळीचे पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा ठाम निर्णय घेतल्याने या उपोषणास कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज  या वेब चॅनल तर्फे आणि     क स मा दे टाइम्स ह्या वृत्तपत्र परिवारा तर्फे जोरदार पाठींबा दिला आहे.पाठींबा देत असताना मुख्य संपादक /संचालक  भारत पवार यांनी म्हंटले आहे की पत्रकारांच्या प्रश्नांना लोकल प्रशासन न्याय देत नसेल त्या विरुद्ध जर तालुका पातळीवर पंचायत समिती चा जो म्होरक्या गटविकास अधिकारी असतो त्यांचे कडे न्याय मागणी साठी धाव घेतली असता त्यांनी न्याय देणे उचित असताना सुद्धा पत्रकारांच्या मागणीची खिल्ली उडविणे हे कितपत योग्य आहे ? असा संतप्त सवाल संपादक पवार यांनी व्यक्त केला असून या साठी  एक जबाबदार आणि ईमानदार पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचेवर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ संबंधित अधिकाऱ्यांमुळे येणे यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असू शकते ? गेल्या २ ते ३ वर्षां पासून मालेगाव तालुक्यातील मौजे वऱ्हाने गावी ” पत्रकार भवन बांधकामा साठी ” शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित गावच्या महिला ग्रामसेविका सुवर्णा साळुंखे यांनी मनमानी करत आज पर्यंत न्याय देण्याची त्यांनी तसदी घेतली नाही.शासन जी.आर.अध्यादेशानुसार जागेची मागणी केली आहे.याबाबत मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांचे कडे वऱ्हाणे येथील ग्रामपंचायतीची व ग्रामसेविका साळुंखे यांच्या कारभाराची चौकशी ची मागणी केली असता चौकशी अधिकारी गुलाब राजबंशी यांनी महिला ग्रामसेविका साळुंखे यांची चौकशी केली असता त्या दोषी असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.तरी सुद्धा येथील गटविकास अधिकारी यांनी राऊत यांना न्याय देण्याची भूमिका न ठेवता बघण्याची भूमिका घेतल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शेवटी युवा मराठा चे मुख्य संपादक तथा राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा ठाम निर्णय घेऊन गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा.पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार असून नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष सी. ई. ओ जो पर्यंत उपोषण स्थळी भेट देऊन योग्य न्याय देत नाहीत तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा ठाम निर्णय राऊत यांनी घेतल्याने अनेकांची झोप उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान गटविकास अधिकारी देवरे यांनी उपोषण करू नका तुमची मागणी निकाली काढतो असे व्हॉट्सॲप द्वारे राऊत यांना निरोप दिल्याचे कळते.मात्र आमरण उपोषणाला सुरुवात होणार असेही राऊत यांनी महाराष्ट्र न्यूज च्या मुख्य संपादकांशी दूरध्वनी द्वारे बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here