
भारत पवार : मुख्य संपादक /संचालक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र भरातील वाचक संख्या : 90232 + आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क : मो. 9158417131
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कर्नाटक , आंध्रप्रदेश मध्ये अतिवृष्टी झाल्याने तेथील राज्यातील कांदा पीक होत्याचे नव्हते झाले.इतके भयंकर कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. तेथील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ऑक्टोबर महिन्यात कांदा पीक महागणार असल्याचे व्यापाऱ्यांनी शक्यता व्यक्त केली आहे. दसरा,दीपावली सणा नंतर कांद्याची गरज भासते त्यामुळे कांदा पीक महागणार असून बाजारात किरकोळ विक्रीस ३० ते ४० रुपये प्रति किलो भाव असणार असेही व्यापाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.ऑक्टोबर महिन्यात कांध्यांचे भाव जर वाढलेत तर महाराष्ट्रातील अन्न दात्यास अर्थात शेतकरी राजास मोठी खुशीची बातमी होणार असेही काही व्यापाऱ्यांनी म्हंटले आहे.
