देवळा पोलीस निरीक्षक लांडगे यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आणतील का त्यांना वठणीवर .. ?

0
113

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील बातम्या,जाहिराती साठी संपर्क करा.संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क :भारत पवार : मुख्य संपादक : 9158417131 * महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 81993 + 
देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : सुनील आहेर : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून चोरी करणाऱ्यांना तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना  देवळा पोलिसानं कडून विशेषतः पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांचे कडून अभय दिले जात आहे त्यामुळे लांडगे यांचे विरुद्ध संताप व्यक्त केला जात असून लांडगे यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वठणीवर आणून अन्याय झालेल्यांना न्याय देण्याची मागणी देवळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर ,पत्रकार गंगाधर शेवाळे यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या कडे केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आहेर यांच्या पेट्रोल पंप वरून डिझेल चोरीला गेले त्याची तक्रार देण्या साठी सुनील आहेर देवळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक लांडगे यांचे कडे गेले असता लांडगे यांचे प्रथम कर्तव्य एफ.आय. आर.(first intimation register) दाखल करून घेण्याचा परंतु समोरचा व्यक्ती कोणीही असो त्यास न्याय न देता त्यास वेड्यात काढण्याचे काम पहिले हे महाशय करत असतात.डिझेल चोरीला गेले तरी यांनी गुन्हा दाखल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.त्या घटनेस एक महिना झाला तरी गुन्हा दाखल होत नाही .याचे कायदेशीर कारण पण देत नाही त्यामुळे आहेर यांनी संताप व्यक्त केला असून जाणून बुजून कर्तव्यात कसूर,मनमानी पणा ” जो मनी देईल त्याचेच काम होईल ” अशी हिटलर शाही लांडगे यांच्या कारभारावरून दिसतेय तर येथील भाजपाचे माजी सभापती यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले याबाबत जिल्हा दैनिकात  हृदयविकाराने निधन अशा प्रकारच्या बातम्या पण छापून आल्या.मात्र अपघात झाल्याचे दाखुन खोटा गुन्हा दाखल केला आहे.मात्र आमच्यावर अन्याय का ? येथे मात्र लांडगे यांनी राजकारण आणून आमचा आवाज दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू केला आहे.त्यामुळे आपण लांडगे यांचे विरुद्ध  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल आहेर यांनी सांगितले .तर देवळा तालुक्यातील माळवाडी ह्या गावी आज पर्यंत कुठल्याही प्रकारचे विटंबना सारख्या घटना घडलेल्या नाहीत मात्र तथाकथित गोसावी यांनी गोसावी समाजाच्या समाधी स्थळांची विटंबना झाल्याची खोटी तक्रार देवळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती.अशा खोट्या तक्रारी विरुद्ध गंगाधर शेवाळे यांनी विभागीय पोलीस अधिकारी कळवण आणि देवळा पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांचेकडे दि.१९/२/२०२२ रोजी फिर्याद अर्ज दिला की आपणा कडे खोटी तक्रार देणाऱ्या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा .अर्ज देऊन सहा महिन्याचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल होत नाही शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे मॅडम यांचे कडे दि.२३/६/०२२ यांचे कडे अर्ज देऊन खोटी तक्रार देणाऱ्या त्या सर्वांविरुद्ध भा. द.वी.कलम २११ व १८२, मुंबई पोलीस अधिनियम कलम २५ ,भा. द.वी.कलम २१७ नुसार गुन्हा दाखल करून खडक चौकशी करून त्यांना शासन करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.मात्र लांडगे यांनी मनमानी करण्याचा कळस खूपच वाढविला असून खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालविला आहे.लांडगे यांची खास खासियत म्हणजे खोटी तक्रार देणाऱ्याच्या गोसावी यांचे घरी वर्दी वरती जाऊन त्यांचेवर कारवाईचे शस्त्र उगरण्या ऐवजी त्यांचे कडून पोलीस ताफ्यासह  सत्कार स्वीकारता की अजून काही स्वीकारले हे खूप लांचनात्मक असून पोलीस विभागाला न शोभणारे कृत्य आहे.याचे छायाचित्र याची सत्यता  आम्ही ह्या बातमीच्या वरती दिलेले आहेच.घरी जावं पण कोणाच्या हे लक्षात घेतले पाहिजे होते की ज्याचे विरूध्द देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज आहे त्याचेच कडे त्याचे घरी  ड्रेस( वर्दी) घालून जाणे आणि ….. पुढील कार्यक्रम करणे म्हणजे गुन्हेगारास अभय देणे ,पाठीशी घालण्याचा डाव ? हे पोलीस दलास काळीमा फासणारे कृत्य नव्हे काय ? असा सवालही शेवाळे यांनी करून  पोलीस अधीक्षक पाटील यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे .पोलीस जनते साठी असतात आणि आहेत.परंतु लांडगे यांच्या कारभारावरून पोलीस गुन्हे करणाऱ्यांसाठी आहेत की काय ? अशी परिस्थिती देवळा पोलीस निरीक्षक लांडगे यांनी करून टाकल्याने भविष्यात सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल होणार असे अन्यायग्रस्त नागरिकांना वाटू लागले आहे.त्यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील आहेर व पत्रकार गंगाधर शेवाळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे अधीक्षक पाटील यांचे कडे केली आहे.

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 81993 + 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here