“महाराष्ट्र न्यूज”चा दणका,दुगाव सोरट वाल्यांचा भणका, ईमानदार,कर्तव्यनिष्ठ पोलीस आणि अधिकाऱ्यांनी बातमीची तात्काळ घेतली दखल,बेकायदेशीर दुकान जप्त,गुन्हा दाखल
1 min read

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे. इच्छुक युवक युवतींनी संपर्क करा.भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131. महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 81661 +

चांदवड : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर: भारतराज पवार / सुरेश जगताप : चांदवड तालुक्यातील दुगाव येथे अनेक काळा पासून चालत असलेला बेकायदेशीर विनापरवाना अवैध धंद्या विषयी काल कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज मध्ये ” पोलिसांनी केला चकणा डोळा, सोरट मटका वाले दुगाव मधून रुपये करतात गोळा ” अश्या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.अवघ्या तीन ते साडेतीन तासात ह्या बातमीची चांदवड पोलीस निरीक्षक व पोलिसांनी तात्काळ दखल घेत दुगाव येथील अवैध धंद्यावर रेड टाकून सोरट जुगाराचे साहित्य ,रोख रक्कम आणि अवैध धंदा करणाऱ्यांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत चांदवड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल १२ : ३५ वा. कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज मध्ये बातमी प्रकाशित होताच चांदवड पोलीस स्टेशन चे ईमानदार व कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आणि पोलिसांनी लगेच धाव घेत दूगाव येथे चालवल्या जाणाऱ्या अवैध धंद्यावर दुपारी ४:४५ वा.( १६:४५ वा.) धाड टाकून रू.१२१० रोख रक्कम, सोरट जुगाराचे साहित्य जप्त करून सूर्यभान कळू मांजरे,रा.पिंपरी ,ता.निफाड, अक्कबाई धोतरे, रा.दुगाव,आसिफ शेख (व.३१)रा.मनमाड ,संजय रामू पाटील ( व.४१) यांना ताब्यात घेऊन कलम १२ (अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो. कॉ.भूषण सूर्यवंशी , कॉ.यू.एन.गोसावी यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चांदवड पो.ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार पी. एन.गायकवाड, दीपक मोरे, बाळा वाळेकर,महिला कॉ.यमुना बेर्डे,शिल्पा काळ हे करत आहेत.दरम्यान पोलीस आणि अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिक पणाने राहिल्यास अवैध धंद्यास कायमचा चाप बसून ” उतू ” जाणार नाहीत आणि गरीबांचे संसार बरबाद होणार नाहीत अशी चर्चा सुज्ञ नागरिकांकडून गावात होत असून चांदवड पोलिसांचे प्रामाणिक पणाचे कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 81661 + संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त केले जात आहेत.इच्छुकांनी संपर्क करा. भारत पवार : मुख्य संपादक : 9158417131