
परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी बातम्या आणि जाहिराती करीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक : मो. 9158417131. महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 83,777 +
देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : भारत पवार : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी गावी रात्री अचानक हिंदू मुस्लिम दंगल पेटल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती.ह्या घटनेची खबर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने कळवण,देवळा आणि मालेगाव चे पोलीस घटनास्थळी तैनात करून दोघा समाजातील संघर्षाची ठिणगी टाळल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सतर्कतेमुळे गावातील पुढील अनर्थ टळला. याबाबत महाराष्ट्र न्यूज च्या हाती सगळ्यात प्रथम बातमी पडताच मुख्य संपादक भारत पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आदरणीय सचिन पाटील साहेब यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणास्तव दोन्ही समाजातील दोन युवकांत कुरबुर निघाली त्याचे पर्यावसान हिंदू मुस्लिम दोघा समाजातील संघर्ष पेटण्यात झाले. इतके की दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी देवळा पोलिसांनी लागलीच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना घटनेची माहिती दिली.अधीक्षक पाटील यांनी कळवण,मालेगाव व देवळा येथील पोलिसांची कुमक मागून बंदोबस्त तैनात केला.आणि रात्रीच आदरणीय सचिन पाटील साहेब सावकी गावी घटनास्थळी रवाना झाले. सद्या वातावरण शांत असून मात्र तणावपूर्ण आहे.पोलीस आणि एस आर पी जवानांची तुकडी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून जिल्हा पोलिस अधीक्षक आदरणीय सचिन पाटील साहेब, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय खांडवी साहेब जातीने लक्ष ठेऊन असून परिस्थिती नियंत्रणाखाली असून जनतेने अफवांवरती विश्वास ठेऊ नये. बैल पोळा सणआणि येणारा गणेशोत्सव सण शांततेत पार पाडावेत असे आवाहन वरिष्ठ अधिकारी पाटील व खांडवी यांनी तसेच देवळा पोलिसांनी केले आहे.
महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 83,777 +
