पोलिसांनी केला चकणा डोळा, सोरट,मटका वाले दुगाव (चांदवड)मधून रुपये करतात गोळा..! दुगावं मध्ये अवैध धंदे जोरदार राजरोसपणे सुरू

0
96

परखड, निर्भिड, सडेतोड, लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा.तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात ,तालुक्यात पत्रकार नियुक्ती केली जात आहे. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 81501 +

चांदवड : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका रेणुका देवी ने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि सद्या श्रावण महिना चालू असलयाने अनेक ठिकाणचे,गावोगावचे भक्तगण देवी दर्शन साठी येत असतात म्हणून भक्तिगनाचा गर्दीचा लयलोट असतो.अशातच तालुक्यातील दुगाव मनमाड रस्त्याला अगदी लागून आहे.ह्या रस्त्यावरून नाशिक,मनमाड, ,नांदगाव,चांदवड,देवळा येथील वाहतूक सारखी चालूच असते. दुगांव गावातील ग्रामस्थ अत्यंत भाविक आणि एकमेकांना संकट समयी मदत करणे गुण्या गोविंदाने नांदणारे भाविक येथे आहेत.विशेष म्हणजे ह्या गावी चांदवड _  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे.अशा ह्या दुगाव मटका , सोरट ,देशी ,विदेशी दारू ,चक्री जुगार आदी अवैध धंदेवाल्यांनी उच्छादच मांडला आहे.

दूगाव हे जणु काय अवैध धंद्यांचा बाजार आहे. पोलिसांनी का करावा चकणा डोळा ? स्थानिक पातळीवरील  राजकारणी आणि पोलिसांची जणू काही मेहरबानी केली असल्याची चर्चा येथे होत आहे.कारण हे धंदे बंद का केले जात नाही मेहरबानी की हात ओले केले जातात की काय ?असा सवाल जनतेने व्यक्त केला आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून दुगावं मध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरले आहे.
चांदवड मनमाड रस्ता लगत दुगाव बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर देशी, विदेशी दारू, मटका सोरट चकरी सारखी जुगार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.
मनमाड येथील काही गुन्हेगारी प्रवृत्ती च्या गुंडांनी येथे गावात येऊन गाव आणि गावकुसावरील शाळकरी मुले, व सभ्य नागरिकांना जणु काय वाम मार्गाला लावण्याचा विडाच उचलला आहे अशी प्रतिक्रिया दबक्या आवाजात केली जात आहे.
चांदवड तालुक्यातील तसेच दुगाव ग्राम पंचायत मधील सदस्य, समाजसेवक,राजकारणी, आणि पोलिस प्रशासनाने वेळीच आळा घालावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिका करवी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.इच्छुकांनी  9158417131 ह्या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा.

महाराष्ट्र न्यूज एकूण वाचक संख्या : 81501 +

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here