मविप्र’प्रगती ‘ पॅनलला सभासदांचा पाठींबा, कोणत्याही संस्थेत स्वार्थ आला तर अधोगती होते हा इतिहास आहे : केदानाना आहेर

0
59

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 वन कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात पत्रकार नियुक्त केले जात आहेत.इच्छुक युवक, युवतींनी अवश्य संपर्क करा. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131

महाराष्ट्र न्यूज ‘ वाचक संख्या ‘ _ 81397 + 

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अँड न्यूज पेपर  : मविप्र संस्थेची निवडणुकीचा धुराळ संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जोरदार उडत असून अनेक ठिकाणी प्रगती पॅनलला सभासदांचा पाठींबा मिळत असून उमेदवारांत मोठा उत्साह संचारला आहे.तर विरोधकांची मोठी दमछाक होते आहे.त्यामुळे मविप्र निवडणुकीचा प्रचाराचा जोर अधिक वाढला आहे. देवळा येथे प्रगती पॅनलचा मेळावा नुकताच पार पडला कोणतीही संस्था ही शिस्त मुळे टिकते.कोणत्याही संस्थेत स्वार्थ आल्यावर अधोगती झाल्याचा हा इतिहास आहे. मवीप्र संस्था टिकली पाहिजे पवार आणि आहेत एकत्र आल्याने आता विरोधकांची डाळ शिजणार नाही असे देवळा येथील मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांनी बोलताना सांगितले.मेळाव्यास सुरेशबाबा पाटील,रामचंद्रबापू पाटील,संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार,सभापती माणिकराव बोरस्ते,चिटणीस डॉ.सुनील ढिकले,दिलीप मोरे,माणिकराव शिंदे,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.आत्माराम कुंभार्डे, माजी.आ.उत्तमबाबा भालेराव, देवळा येथील डॉ.व्ही.एम.मिकम,सुरेश कळमकर ,हेमंत वाजे, नाना महाले,सचिन पिंगळे,प्रा.रावसाहेब शिंदे आदी उपस्थित होते. आहेर यांनी पुढे बोलताना सांगितले की,संस्थेला शासनाकडून येणे असलेला निधी मिळून देऊ.इतर अनुदान मिळून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून कसमादे चे सभासद ताईंसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधक हे विरोधा साठी विरोध करत असुंसंस्थेचा विकासाचा आलेख हा ” प्रगती ” वर असून कोविड काळात संस्थेने केलेल्या कामाचे शासनाने कौतुक केले असल्याचा उल्लेख डॉ.ढिकले यांनी यावेळी बोलतांना केला.संस्थेचा भारतभर ” नावलौकिक ” असून कर्मवीरांच्या त्यागातून संस्था उभी राहिली आहे.असे डॉ. व्ही एम निकम यांनी बोलतांना सांगितले.आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल डॉ. निकम यांनी सविस्तर माहिती दिली.तर शिक्षण हे वाघिणीचे दूध असून संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कायम कार्यरत राहू असेही संस्थेचे सरचिटणीस नीलिमा ताई पवार यांनी यावेळी सांगितले.देवळा भागा साठी अनेक आश्वासन नीलिमाताई पवार यांनी उपस्थितांना दिली.

कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ‘ वाचक ‘ संख्या : 81397 +

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here