ग्रामपंचायतीची ग्रामसभा येत्या शुक्रवारी

0
109

प्रखड,सडेतोड,निर्णायक लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 असलेले कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती तसेच राज्यात पत्रकार नियुक्ती साठी इच्छुक युवक, युवतींनी संपर्क करा. भारत पवार  : मुख्य संपादक: संपर्क  9158417131

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 80977 + 

देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील माळवाडी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा येत्या शुक्रवारी दि.१२/०८/२०२२ रोजी सकाळी ९:३० वा.ग्रामपंचायत कार्यालयात ठेवली असल्याची माहिती सरपंच शिवाजी बागुल व ग्रामसेवक संभाजी देवरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. दरवर्षी माळवाडी गावातील ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सभा मंडपात आयोजित केली जात होती.ह्याच वर्षी १५ ऑगस्ट आधी आणि ग्रामपंचायत कार्यालयात ठेवली असल्याची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांनी दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात किती ग्रामस्थ बसणार हि साशंकता आहे.ग्रामसभेत झालेल्या खर्चास मंजुरी देणे,घरोघरी तिरंगा उपक्रमा बाबत चर्चा,जलजिवन मिशन बाबत चर्चा ,कोविड लसीकरण,घरपट्टी, पाणीपट्टी, म.गांधी तंटामुक्त ग्राम समिती स्थापन करणे,माझी वसुंधरा अभियाना बाबत चर्चा,N R E G A सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचे लेबर बजेट तयार करणे , म.गांधी रोजगार हमी योजने   चे पुढील२०२३-२०२४ चा कृती आराखडा तयार करणे ,१५ ऑगस्ट साजरा करणे , द.वसू योजनेचा कृती आराखडा तयार करणे आणि ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करणे यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच ,ग्रामसेवक व ग्रामपंचायत  शिपाई संजय सोनवणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 80977 + 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here