आर.पी. कुवर …कुपोषित व अनाथ बालकांच्या जिवनात आणतील बहर …!! १०० कुपोषित बालके घेतले दत्तक ,गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता…हिच मालेगाव तालुक्याची रहस्यता…!!!

0
59

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव येथील निवृत्त नायब तहसीलदार रावसाहेब कुवर ( आर.पी.कुवर ) यांनी १०० कुपोषित व निराधार बालक दत्तक घेत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा रोप्यमहोत्सव कुपोषित व निराधार बालकांच्या जिवनात सुखमय आनंदाची बहर आणून साजरा केला. कुपोषितांच्या आणि निराधार बालकांच्या संकट समयी सहारा बनून त्यांना दत्तक घेतल्याने जिल्ह्यात सर्वत्र कुवर यांचे कौतुक केले जात आहे.आर.पी. कुवर यांनी नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त होऊन गरीब व अनाथांसाठी आयुष्य घालवणार असा हेतू मनाशी बाळगून सेवानिवृत्त झाले.आणि त्यांनी सहा वर्षांच्या कालावधीत १०० कुपोषित व अनाथ बालके दत्तक घेत कुपोषित व अनाथांचे नाथ होऊन आपला हेतू कुवर यांनी साध्य केला. कुवर हे यशवंत सेनेचे राज्य उपाध्यक्ष पदी कार्यरत असून समाज कार्यास त्यांनी स्वतःस झोकून दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडत न्याय मिळून दिला.२०१६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आक्रनी – धडगाव येथील पहिले कुपोषित बालक दत्तक घेत कुपोषित व अनाथांचे” नाथ ” बनण्याच्या सामाजिक कार्यास सुरुवात केली.गेल्या सहा वर्षांपासून अविरत कार्य सुरू ठेऊन यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सवी वर्षा पर्यंत विविध गावातून,जिल्ह्यातून १०० कुपोषित आणि निराधार बालके दत्तक घेत तालुक्यात आदर्शसेवा निर्माण केली आहे.अनाथ,कुपोषित बालके दत्तक घेण्या मागे पत्नी, मुले,सूना यांच्या सहकार्याने मला प्रेरणा मिळत असल्याचे रावसाहेब कुवर ( आर.पी. कुवर) यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये कुवर यांना संसर्ग झाला होता दैवयोगाने आपणास परमेश्वराने जीवदान देऊन पुनर्जीवन लाभल्याने मिळालेले हे ” बोनस ” आयुष्य निराधार व कुपोषित बालकांच्या जिवनात बहार फुलविण्या बरोबरच सामाजिक कामासाठी घालवणार असल्याचेही कुवर यांनी यावेळी सांगितले.येथील राष्ट्रीय एकात्मता प्रकल्प कार्यालयात तालुक्यातील वजीरखेडे येथील दोन बालके दत्तक घेऊन १०० वे बालक दत्तक घेण्याचा हेतू आर.पी.कुंवर यांनी साध्य केला.या बालकांना वर्षभर शैक्षणिक खर्च,वर्षभर लागणारा किराणा बाजार कुंवर परिवारातर्फे घेऊन दिला जातो.कुंवर यांच्या ह्या कार्याची दखल गिनीज बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .या कार्यक्रमास मालेगावचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी एस.अहिरराव, डाक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील,निमगावचे माजी सरपंच दुर्गादास नंदाळे ,बळीराम अहिरे, भागचंद तेजा, जे.के.रॉय, के.आर.मोरे, ओ.पी.सावंत,जे. एस.देसाई, एस.एम.तडवी,यु.बी.ठोके, अरुणा देवरे, भारती बोराळे,आय.बी.शेख आदी उपस्थित होते.

कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” वाचक संख्या 80855  +

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here