देवयानीची लीलया भारी..! देवळा तालुका कौतुक करी..!! बालवयातच पुरणाच्या पोळ्या करायला लागली आजच्या शिक्षित महिलांना “आदर्श” ठरली

0
73

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 वेब न्यूज चॅनल  कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “ साठी आपल्या बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क करा. महाराष्ट्र भरातील वाचक संख्या : 79017 + संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक :  मो. 9158417131

देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर :  दिनकर भदाणे  : खापरावरच्या मांड्या अर्थात पुरणाच्यापोळ्यांचे जेवण म्हणजे प्रीती भोजन त्या भोजना शिवाय कुठल्याही सणाचे वैशिष्ट्य साध्य होऊ शकत नाही आजही पुरणाच्या पोळ्या शिवाय जेवणाचा” पांग” फिटत नाही हे तितकेच खरे.परंतु पुरणाच्या पोळ्या हि प्रथाच बंद पडलेली आहे की काय असे झाले आहे.अपवाद फक्त ग्रामीण भागाचा सोडला तर शहरी भागात खापरी वरील पुरणाची पोळी च शिजत नाही नव्हे तर दिसतच नाही.कारण आजच्या शिक्षित महिलांना हे ” कुटाणे” करणे त्यांच्या डोक्याच्या बाहेरचे झाले आहे त्यामुळे शहरी घरातील खापर ” फोडल्यात” जमा आहे असे वाटते.ग्रामीण भागात सुद्धा खापरी वरील पुरणाची पोळी ( मांड्या) बनविण्याची कला ठराविक महिलांनाच असते त्याही जुन्या महिला असतील तर… आताच्या महिला शिक्षित असून सुद्धा हि कला कधीच मागे टाकली हे त्यांनाही सांगता येणार नाही.आज अनेक शेत्रात महिला राज अवतरले आहे.पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला वावरते आहे.विशेष म्हणजे आपल्या भारत देशाच्या आजच्या नवनिर्वाचित पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मु ह्या विराजमान झाल्या. हि मोठी अभिमानाची बाब आहे.महिला सर्वच ठिकाणी पुढे आहेत परंतु खापरच्या पुरणाची पोळी (मांडे) बनविण्यात नक्कीच मागे पडल्या आहेत.त्यामुळे बऱ्याचशा महिला तव्या वरच्या मांड्या ( पुरण पोळीस) नाईलाजास्तव पसंती देतात.यामुळे सण साजरा केला असे काहीसे वाटत नाही म्हणून आजचे युग पुरुष ना_ईलाजाने केट्रस ना ऑर्डर देऊन आपले फलित साद्य करून घेतात.परंतु घरातच आपली लक्ष्मी स्वहाताने खापरच्या पुरण पोळ्य (मांड्या ) बनवून घरच्यांना खाऊ घातल्या तर पुरुषाची छाती अभिमानाने ५६ इंच होणार.यासाठी लागते जिद्द,चिकाटी आजच्या महिलांनी हि जिद्द आणि चिकाटी यापासून कोसो दूर झाले आहेत.परंतु याला अपवाद ठरली ग्रामीण भागातील एक बालिका.नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील साधारणतः ११ते१२ वर्ष बाल वयाची देवयानी दावल भदाणे हि बालिका खापरच्या पुरणाच्या पोळ्या (मांडे) सहज आणि तत्परतेने करते त्यामुळे देवयानी देवळा तालुक्यातील महिलांसाठी एक अभिमान ठरली असली तरी आज महाराष्ट्र भरातील शिक्षित महिलांन साठी आदर्श ठरली आहे.त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तर माळवाडी गावा साठी “अभिमानाची भूषण देवयानी “असे चर्चिले जात आहे.देवयानी हि देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात इयत्ता पाचवी त शिकत असून ज्ञानार्जनाबरोबर घरातील किचंनच्या कामाची जिद्द बाळगून पुरणाचे मांडे (पोळ्या) बनविण्याची कला आजच्या शिक्षित महिलांना आदर्श ठरली आहे.लहानपणा पासून अभ्यास करून आईच्या कामात मदत करत असते.तिचे काका दिनकर रामचंद्र भदाणे व वडील दावल रामचंद्र भदाणे यांचा केट्रिंग चा व्यवसाय असल्याने त्यांचे सारेच कुटुंब याच कामात व्यस्त असतात.वडिलोपार्जित यांचा व्यवसाय असल्याने मांडे बनविण्यात ते पटाईत आहेत.विशेष म्हणजे लग्न कार्य असो की दिवटी बुधली किंवा जावळांचे कार्य असो काका दिनकर भदाणे यांनी बनविलेली मटणाची भाजी किंवा उसळ वा कोणतीही भाजी असो अत्यंत चवदार असते.हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल.त्यांच्याच अनुकरणातून देवयानी जात असून पोळपाटावर शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीत गूळ टाकून डाळ वाटून (पुरण करून) गव्हाच्या पिठाची पोळी लाटून त्यात पुरण भरून पोळी दोन्ही हातांच्या मनगटांची फिरकी अगदी दोन्ही हाताच्या कोपरा पर्यंत सहजतेने फिरवून मोठी पोळी बनविणे खापरावर अलगद टाकने भाजल्यावर नंतर पुन्हा उलटवून भाजणे पोळी भाजून तयार झाल्यावर तिची योग्य तऱ्हेने घडी करणे अशी सर्व कामे देवयानी स्वतः करते.देवयानी पोळ्या करण्यात इतकी सराईत झाली की तिच्या ह्या धाडसी जिद्दीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.आमचा केटरर्सचा व्यवसाय असल्याने आम्ही बाहेरच्या ऑर्डरी घेत असतो त्यामुळे खापरचे पुरणाचे मांडे ( पोळ्या) बनऊन देत असताना कामात खूप धावपळ होत असते त्यामुळे देवयानी शाळेतील अभ्यास करून स्वतःच हिमतीने मांडे बनविण्यात पटाईत झाली असल्याचे तिचे काका दिनकर भदाणे व वडील दावल भदाणे यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here