दुखणे वाढले : दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी केली मालेगावी संतापाची लाट उसळली ,बंडखोरांच्या छातीवर पाय ठेऊन भगवा” मानाने” फडकवू _ रामा मिस्त्री

0
83

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण  महाराष्ट्रातील नंबर 1 असलेल्या” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी बातम्या ,जाहिराती साठी संपर्क करा. तसेच संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात” पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुक असलेल्या तरुण व तरुणींनी अवश्य संपर्क करा .संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक मो.9158417131 ** महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या 76227 + 

 नाशिक /मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी  गद्दारी केलेल्या आमदारां विषयी प्रचंड संताप व्यक्त केला असून नाशिकच्या माजी ३३ नगरसेवकांसह नाशिक मधील शिवसैनिक आजही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोबत असून मालेगावचे काही शिवसैनिक व नाशिकचे माजी ३३ नगरसेवकांसह ,शिवसैनिक आज मुंबई येथे मातोश्री वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मालेगाव मधील शिवसैनकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून हजारो शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपजिल्हा अध्यक्ष रामा मिस्त्री यांनी बैठक घेऊन आपला संताप व्यक्त केला.ज्या शिवसैनिकांनी २० वर्षां पासून जीवाचे रान करून दादा भुसेना निवडून आणून आमदार केले ज्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुखा मुळे एकेकाळी सहकार मंत्री,कृषी मंत्री पद भूषविले अशा भुसेनी येथील शिवसैनिकांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाशी अर्थात उद्धव ठाकरे यांचेशी गद्दारी करून शिंदे यांच्याशी घरोबा केल्याने मालेगावच्या शिवसैनिकामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.मालेगाव मधील शिवसैनिक सदैव उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आता तर शिवसेना प्रचंड ताकदीने जोमाने वाढवू आणि बंडखोरांच्या छातीवर पाय ठेऊन आपला भगवा मानाने फडकवू , गद्दारांना त्यांची जागा दाखवू असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.यावेळी रामा मिस्त्री यांनी सांगितले की,एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरल्या नंतर आमदार भुसे यांचेशी चर्चा करूनही त्यांनी शिंदे यांचेशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला.परंतु शिवसेनेचे माजी उपजिल्हा अध्यक्ष प्रमोद शुक्ला,महानगर प्रमुख राजाराम जाधव यांचेसह काही शिवसैनिक  उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष रामा मिस्त्री यांनी  सांगितले.आज रविवारी मुंबई येथे मातोश्री वर जाऊन उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही मिस्त्री यांनी सांगितले.मालेगाव मनपाचे उपमहापौर निलेश आहेत, कृ. ऊ.बाजार समिती चे उपसभापती सुनील देवरे,संजय दुसाने,मनोहर बच्छाव यांनी भुसे यांना साथ दिली असली तरी लवकरच त्यांची हकालपट्टी होईल असे संकेत देऊन मालेगाव येथे लवकरच भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचेही मिस्त्री यांनी यावेळी जाहीर केले.तर बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष व मालेगाव महानगरसह तालुक्यातील जनतेचे ताईत बनलेला नेता बंडूकाका बच्छाव यांची नाराजी यापूर्वीच दादा भूसेनी ओढवून घेतल्याने नाराजीत नाराजीचा सूर म्हणून दादा भुसे यांनी आपले दुखणे वाढवून घेतल्याने भविष्यात भुसे यांना कटू अनुभवांना सामोरे जाण्याची आव्हाने वाढण्याची जोरदार चिन्हे आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here