कवयित्री पूनम गमरे ” आदर्श कविरत्न राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव ” पुरस्काराने सन्मानित
1 min read

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 असलेले कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती साठी संपर्क करा तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो. 9158417131

रत्नागिरी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावच्या कन्येचा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल (कोल्हापूर) करवीर नगरीत राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मान …
कवयित्री. पूनम लक्ष्मण गमरे पिरंदवणे या युवा तरुणीने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याबरोबरच साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रत्नसिंधू कलामंच रत्नागिरी महाराष्ट्र संस्थेकडून राज्यस्तरीय रत्नसिंधू युवा कवी प्रज्ञागौरव पुरस्कार सन २०२२ व विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन सांगोला (पंढरपूर) यांसकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार, तसेच राजमाता जिजाऊ पुरस्कार औरंगाबाद अशा महत्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
घरामध्ये कोणताही साहित्यिक क्षेत्राचा वारसा नसतानाही साहित्यावर असलेल्या अतोनात प्रेमापोटी त्यांनी साहित्यिक क्षेत्रात पदार्पण केले. साहित्याची आवड असल्याने त्या नेहमीच कविता ,कथा ,गझल, अलक , मुक्तछंद, सामाजिक, वैचारिक लेख असे अनेक साहित्य प्रकार हाताळत होत्या . त्याच बरोबर ग्राफिक्सचाही छंद आहे. दरम्यान साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कवयित्री. पूनम लक्ष्मण गमरे(मुंबई) यांना ज्ञानज्योती सेवाभावी सस्था सोलापूर
प्रणित
आदर्श कवीरत्न प्रेरणा गौरव पुरस्काराने ज्ञानज्योती सेवाभावी संस्थेचे संस्थापक मा. डॉ विक्रम शिंगाडे सर ,प्रसिद्ध उद्योजिका मा. डॉ सुमित्रा पाटील (कोल्हापूर) , प्रसिद्ध उद्योजक मा. अभयदादा भोर, जेष्ठ विचारवंत मा. प्रा. प्रकाश कदम सर, जेष्ठ साहित्यिक तथा DBA महाराष्ट्र संस्थापक डॉ. सुरेश विष्णू कुराडे सर तसेच सुप्रसिध्द गझलकार मा.सिराज शिकलगार आदी . मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल कवयित्री. पूनम लक्ष्मण गमरे यांच्यावर साहित्यिक क्षेत्रातून तसेच अन्य क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे….