किरकोळ वस्तूंवरअखेर जीएसटी लावलाच ! तो रद्द करण्यास साठी पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1 min read

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर १ वेब चॅनल. आपल्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा . भारत पवार : मुख्य संपादक , मो.9158417131

* महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात ” पत्रकार ” तसेच विविध पदा साठी तरुण , तरुणी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.तरी इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वरती संपर्क करा.
नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : केंद्र सरकारने काल सोमवार पासून अत्यावश्यक किरकोळ वस्तूंवर पाच टक्के जीएसटी ( वस्तू व सेवा कर ) लागू केला आहे.त्यामुळे गरीब नागरिकांच्या खिशास मोठाच फटका बसणार असून गरीबांचे जीवन जगणे मोठे मुश्किल झाले आहे. बिगर ब्रॅण्डेड पॅक बंद खाद्य पदार्थ असलेल्या वस्तू तांदूळ, डाळ, गहू,गव्हाचे पीठ, तृणधान्ये , दही,लस्सी यांसारख्या किरकोळ वस्तू २५ किलो पेक्षा आतील असतील आणि ते पॅक करून लेबल लावून विक्री केल्यास त्यावर पाच टक्के कर लागू करण्यात आला आहे.जर एखाद्या दुकानदाराने १० किलोच्या पिशव्या करून अशा १० पिशव्या एका मोठ्या गोणीत बांधून विकल्या तर ती १०० किलोची एकच गोण असे न पकडता त्यातील १० किलोची एक पिशवी असे प्रत्येकी एक पिशवी याप्रमाणे विक्री करून पाच टक्के जीएसटी ग्राहकास द्यावा लागणार आहे.त्यामुळे गरीबांचे जगणे ,खाणे महाग झाले असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून केंद्र सरकारने गरीब जनतेचे हित न साधता स्व हित साध्य करत गरीबांचा तोटा तर शासनाचा फायदा असेच काहीसे चालविले असल्या मुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तर नाशिक येथील चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नव्याने आकारण्यात आलेल्या पाच टक्के जीएसटी मुळे राज्यातील गरीब व सर्वसामान्य जनतेतील व व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना देऊन नव्याने लावलेला पाच टक्के कर रद्द करण्याचे खूप गरजेचे असल्याचे साकडे घातले.यावेळी मुख्यमंत्री यांनी आपण व्यापारी व गरीब जनतेच्या भावनांशी सहमत असून हा कर रद्द करण्या साठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात नाशिकचे उद्योजक आशिष नहार ,राज्यातून संदीप भंडारी,नीरव देडिया,विकास अच्छा,दीपक मेहता,सागर नागरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.