मालेगाव शहरातील पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद राहणार …का ? वाचा…

0
85

निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर १ वेब चॅनल ” महाराष्ट्र न्यूज “ करीता आपल्या परिसरातीलबातम्या आणि जाहिराती साठी आणि पत्रकार नियुक्ती करीता  निसंकोचपणे संपर्क करा .वाचक संख्या ७५५७६ + (पेक्षा जास्त ) संपर्क मो.९१५८४१७१३१          मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील  मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, गिरणा धरण येथुन येणारी पाईप लाईन उंबरदे गावाजवळ व दहीवाळ गावातुन येणा-या पाईप लाईन दहीवाळ गावात लिकेज झालेली आहे. व व्हॉल्व नं. ३६ मधुन मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाशी निगडीत अत्यावश्यक विद्युत देखभाल दुरुस्तीचे कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरचे काम लवकर लवकरात करणे अत्यंत आवश्यक असल्याने उक्त कामासाठी
सदरचे काम करणेकामी दि. १६/०७/२०२२ (शनिवार) रोजीचा शहरातील पाणी पुरवठा २४ तास खंडीत होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवस आड करण्यात येईल. गिरणा धरण येथे Shut Down घेतल्याने दि.१६/०७/२०२२ रोजी नियोजित पाणी पुरवठा हा दि. १७/०७/२०२२ रोजी तसेच १७/०७/२०२२ रोजीचा पाणी पुरवठा करण्यात दि. १८/०७/२०२२ रोजी करण्यात येईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
तरी नागरीकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशीराने होणाऱ्या पाणीपुरवठया बद्दल मालेगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे. व पाणी जपुन वापरा.असे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आयुक्त मालेगांव महापालिका व उपअभियंता पाणी पुरवठा यांच्या कडून आव्हान करण्यात आले आहे
*निलेश कासार* , मालेगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here