१३ जुलै ते १७ जुलै दरम्यान ह्या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार : हवामान तज्ञ पंजाबराव डंख
1 min read

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन वेब चॅनल ” महाराष्ट्र न्यूज ” वाचक संख्या ७५००० + ( पेक्षा अधिक) .आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा.आपली जाहिरात काही सेकंदात महाराष्ट्रातील घराघरात प्रतिसाद मिळणार जोरात.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक :मो.९१५८४१७१३१. पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने जोरदार आगमन केले असून अनेक ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे तर बऱ्याचशा ठिकाणी शेतीचे नुकसान पण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.हा पाऊस १७ जुलै पर्यंत असाच राहणार असून यात पुन्हा जोरदार वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.महाराष्ट्रातील प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी नुकताच सुधारित अंदाज व्यक्त केला आहे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावधानता बाळगावी असेही त्यांनी सांगितले आहे.डंख यांनी व्यक्त केलेल्या अंदाजा नुसार १३ जुलै ते १७ जुलै दरम्यान राजधानी मुंबईत अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. सुधारीत अंदाजानुसार हवामानात मोठा बदल झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे,नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे.तर अहमदनगर ,लातूर,सोलापूर,बीड,सातारा,सांगली,पुणे , कोकण किनारपट्टी,पूर्व व पश्चिम विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र येथेही पाऊस जोरदार कोसळणार असल्याचे डंख यांनी सांगितले.
