राज्याच्या प्रगतीत केंद्र सरकार चा सहभाग महत्वाचा _ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1 min read

परखड , निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन वेब चॅनल साठी बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक : मो. 9158417131

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बंडखोरी करून सत्तांतर नाट्याचा प्रयोग यशस्वी करून प्रथमच दिल्ली येथे गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.रात्री उशिरा पर्यंत बैठक सुरू होती.यावेळी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याचेही कळते.आषाढी एकादशी झाल्यानंतर आम्ही मुंबईत मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असेही शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधान यांनी मला खूपच वेळ दिला. राज्याचा प्रगतीत केंद्र सरकारचा सहभाग महत्वाचा असतो तुम्हास जे काही पाहिजे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून मी देण्यास तयार आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास सांगितले असलयाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिंदे आणि फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याही भेटी घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.