मेंढपाळांच्या न्याय, हक्कासाठी यशवंत सेनेचे नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन
1 min read

निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन वेब न्यूज चॅनल साठी आपल्या बातम्या आणि जाहिराती करीता अवश्य संपर्क करा.काही सेकंदात महाराष्ट्रातील घराघरात पोहचणार ,नागरिकांचा प्रतिसाद जोरात मिळणार… संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : संपर्क ,मो.९१५८४१७१३१

मालेगाव : कासमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर : यशवंत सेना सर सेनापती माधवभाऊ गडदे यांच्या आदेशाने मेंढपाळाच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात यशवंत सेना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वन जमिनी ( पाश्चर फॉरेस्ट) लागवड अयोग्य जमिनीमधून क्षेत्र राखीव ठेवण्यात यावे आणि उर्वरित क्षेत्रात वृक्ष लागवड करून त्यांचे जोपासना करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. नाशिक,नगर,धुळे, जळगाव ,नंदुरबार जिल्ह्यातील मेंढपाळा बाबत नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्त मा. राधाकृष्ण गमे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याबाबत विभागातील संबंधितांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश देणार असल्याचे गमे यांनी यावेळी सांगितले. ज्या ज्या गावात मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चालण्यासाठी अडचण असेल त्यांनी संबंधित प्रांत अधिकारी यांच्याकडे सामुदायिक वन हक्क दावे सार्वजनिक स्वरूपात वन हक्काची मान्यता अधिनियम २००६ व त्या अंतर्गत निगरमित झालेले नियम २००८ नुसार वन हक्क समितीकडून दावे दाखल करून जोडपत्र २ प्रमाणे व नियम ११/२ ते ५ अन्वये सार्वजनिक वन दावा हक्क नुसार परंपरागत वन जमिनी धनगर मेंढपाळ हा या व्याख्यात व कायदा अंतर्गत येत असल्याने सार्वजनिक मेंढपाळ चराई साठी प्रत्येक प्रांत अधिकाऱ्यांकडे या संबंधित दावे दाखल करावेत असे आवाहन यशवंत सेने तर्फे करण्यात आले आहे. याबाबत मा.राधाकृष्ण गमे विभागीय महसूल आयुक्त, नाशिक यांना यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आर.पी.कुंवर साहेब,खंडेराव पाटील प्रदेश सरचिटणीस , अरुणदादा शिरोळे नाशिक जिल्हा प्रमुख,बापू दादा मोरे ग्रा.जिल्हा प्रमुख यांचे हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी बारकू दादा ठोंबरे, निंबाभाऊ जाधव, रतन हिरे, सुरेश देवकर, सौ.मीनाताई बिडगर यांचे सह यशवंत सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.