देवळा तहसील कार्यालयातील धारणकर यांची बदली मनोज गांगुर्डे यांचे कडे कार्यभार _ तहसीलदार विजय सूर्यवंशी
1 min read

निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन वेब न्यूज चॅनल.आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क साठी गंगाधर शेवाळे : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल अव्वल कारकून संदीप धारणकर यांना नायब तहसिलदार म्हणून प्रमोशन मिळून बदली झाल्याने गेल्या १० /१२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे तसेच अन्य अनेकविध कामे रेंगाळलेली होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांत नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता . धारणकर यांची साक्री येथे नायब तहसीलदार पदी बदली झाल्याने ते तात्काळ साक्री येथे रुजू झाले .देवळा तहसील कार्यालयात त्यांचे जागी शासनाने अद्याप कोणाचीही नेमणूक केली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती.याबाबत महाराष्ट्र न्यूज ने येथील तहसीलदार विजय सूर्यवंशी यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता धारणकर यांचे जागेवर सध्या येथील महसूल रोजगार हमी योजने ( रोहयो ) चे अव्वल कारकून मनोज गांगुर्डे यांचे कडे नुकताच अतिरिक्त कार्यभार दिला आहे.तो त्यांनी स्वीकारला असून शेतकऱ्यांची कोणतीही कामे असो तात्काळ केली जातील शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही असेही तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.त्यामुळे नागरिकांनी नाराज न होता आपली कामे आता मार्गी लागणार यात शंका तर नाही परंतु शासनाने लवकरात लवकर रिक्त असलेल्या जागेवर स्वतंत्र पणे नवीन महसूल अव्वल कारकून नेमावा अशी मागणी देवळा तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.