सावध : वाऱ्याचा वेग १२ ते १६ किमी असणार, नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता,”यलो अलर्ट ” जारी

0
46

निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल साठी आपल्या बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क साधा : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : गेल्या जून महिन्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे तर मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे तर ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पेरण्याच झालेल्या नसल्याने  शेतकरी अधिकच चिंता ग्रस्त झाला आहे.परंतु शेतकऱ्यांची हि चिंता लवकरच मिटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सद्या नाशिक जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चांगला आणि अनुकूल पाऊस पडणार असे चांगले वातावरण निर्माण झाले असून अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार  आज ५ जुलै मेघगर्जनेसह मध्यम ,६ व ७ जुलै रोजी ठराविक ठिकाणी मुसळधार तर ८ जुलै रोजी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पासून नाशिक सह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.वाऱ्याचा वेगही १२ ते १६ किमी प्रतीतास राहणार असल्याचे म्हटले आहे. आणि वातावरण सुद्धा अनुकल झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण झाले आहे. मध्य महाराष्ट्रात ” यलो अलर्ट ‘ जारी करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी सावध भूमिका घ्यावी तर प्रशासनाने सतर्कता ठेवावी असेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here