अखेर सत्तांतर नाट्याचा संघर्ष संपला : विश्वासदर्शक ठराव शिंदे सरकारने जिंकला

0
63

निर्भिड, सडेतोड,निर्णायक लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन” महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल.आपली बातमी किंवा जाहिरात संपूर्ण महाराष्ट्र भर घराघरात काही सेकंदात पोहचविण्यासाठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर : गेल्या १० ते १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते आणि त्यामुळे ते गढूळही तितकेच झाले होते.त्यावर अखेर आज पडदा पडला.काहीही असो उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून भाजपने सरशी केली. स्वतःच्या आतडीस पिळ देऊन त्यासाठी भाजपला गेली अडीच वर्ष आटापिटा करावा लागला. कारण सत्तेचा मोह .असो.ते काहीही असो परंतु भाजपने सरशी केली हे मात्र खरे.काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप चे राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आणि भाजप ने पहिले टर्म सर केले.राहिले होते विश्वासदर्शक ठरावाचे दुसरे टर्म त्या साठी शिंदे शिवशाही आणि भाजप नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या  हॉटेल ताज मध्ये तातडीने घेण्यात आली.यावेळी बंडखोर आमदारांसह भाजप चे आमदार उपस्थित होते. बैठकीस नवनिर्वाचित मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करून विश्वास दर्शक ठराव आपणच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता.याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठकीचे आयोजन शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.आणि पुन्हा सत्ता संघर्षाच्या दुसऱ्या पर्वास आज सुरुवात झाली होती.राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या आदेशा नुसार दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.त्यानुसार आज विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला.विश्वास कोण जिंकणार ? याकडे समस्त जनतेचे लक्ष लागले होते.यासाठी मतदान घेण्यात येऊन महाविकास आघाडी ला अवघ्या ९९ मतांवर समाधान मानावे लागले.तर शिंदे शाही फडणवीस यांनी मात्र १६४ मत मिळवत विश्वास दर्शक ठराव जिंकला. मात्र तीन आमदारांनी तटस्थ राहून बघ्याची भूमिका बजावली. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास दर्शक ठराव मांडला होता. भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. मतदानाच्या वेळी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार , झिशात सिद्दिकी,धीरज देशमुख हे आमदार उशिरा आल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मनाई करण्यात आली.तर आ.प्रणिती शिंदे प्रदेशात असल्या कारणाने येऊ शकल्या नाहीत.आ.जितेश अंतापुरकर यांचे लग्न ठरल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत.अशा प्रकारे सत्ता संघर्षाच्या कहाणी चा शेवट आज झाला.शिंदे शाही फडणवीस यांनी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here