धुळे जिल्ह्यातील चेतन सोनवणे तर ओझर ची शरयू पवार यांचा देवळा तालुक्यातील फुले माळवाडी गावी जोरदार सत्कार संपन्न
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव वेब चॅनल “ कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ” जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

देवळा / फुले माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळवाडी ह्या गावी गुणवंत विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतल्याने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी देवळा तालुक्यातील शिक्षण शेत्रातील अधिकारी ,अन्य मान्यवर व गावातील समस्त ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित राहून ह्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांचे कौतुकच केले आणि भावी आयुष्यात तुमची भरारी अधिक गगन भरारी जाओ असे आशीर्वाद उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थांनी दिले.
सत्कार समारंभात धुळे जिल्ह्यातील धाडरे गावातील चेतन सोनवणे याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत एन डी ए परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला.घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने चेतनने देशासाठी हि उंच भरारी घेतल्याने धुळे आणि नाशिक जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे.चेतन हा फुले माळवाडी गावचा भाचा असल्याने त्याचा सत्कार मामांच्या गावी ठेवण्यात आला होता.तर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावचे रहिवासी आणि फुले माळवाडी गावचे भूषण ठरलेले संपादक कन्या शरयू पवार ह्या विद्यार्थिनीचे कौतुक सर्वत्र केले जात असून तिने ओझर येथील विश्वसत्य कॉलेज १२ वी सायन्स मध्ये ८९.६७ टक्के मार्क्स घेतल्याने फुले माळवाडी गावी तिचाही जोरदार सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन फुले माळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी ओबीसी देवळा तालुका अध्यक्ष सुरेश जगदाळे यांनी केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवळा गट शिक्षणाधिकारी सतीष बच्छाव होते.आजच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी चेतन सोनवणे व शरयू पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या शिक्षण अशीच उंच भरारी घ्यावी आणि आपले आई वडील ,शाळेचे नाव उज्वल करावे असे बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. आर.पी. आय चे जिल्हा संघटक शांताराम पवार यांनी ग्रामीण भागातून चेतन सारखा विद्यार्थी देशात प्रथम क्रमांक पटकावतो ही अभिमानाची बाब आहे तर शरयू पवार हि विद्यार्थिनी ग्रामीण भागातून च पुढे गेलेली सायन्स शाखते ८९.६७ टक्के मार्क्स घेऊन ओझर कॉलेजचे आणि आपल्या मम्मी पप्पांचे नाव उज्वल केल्याने हि गौरवाची बाब आहे.असेही पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.तर चेतन सोनवणे याने एन डी ए परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक पटकावला ही आपणा सर्वांच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे.तर १२ वी सायन्स मध्ये शरयू ने ८९.६७ टक्के म्हणजे जवळ जवळ ९० टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण होणे हि आमच्या साठी आणि भावी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी अभिमानाची गोष्ट आहे.मन लाऊन अभ्यास केल्यास यश हे आपले घराचा दरवाजा ठोठावत असते.शरयू दिवस भरातून सहा तास अभ्यास करायची असे संपादक भारत पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले. कार्यक्रमास सरपंच उषा शेवाळे,रुपाली गांगुर्डे,फुले माळवाडी प्रा.शाळेचे मुख्याध्यापक,सोनवणे सर,बागुल सर,सर्व शिक्षक,शिक्षिका,माळवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील सुरेश बच्छाव, कलपेश जगदाळे,बापू बच्छाव, अनिल अहिरे,बाळू खैरनार, दिलीप बच्छाव ,लक्ष्मण बागुल, पंकज गांगुर्डे, पत्रकार प्रमोद पवार,रवींद्र बागुल, शिवराम बच्छाव, पवन माळी ,अंगणवाडी सेविका,मदतनीस ,गावातील ग्रामस्थ,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.