September 21, 2023

शेतकऱ्यांच्या आनंदा साठी बातमी वाचा ….

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव वेब न्यूज चॅनल क समादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज नेटवर्क : सध्या महाराष्ट्रातील राजकारण खूपच ताण तणावाचे झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.महिला सुदधा मागे नाहीत नाशिक येथे काल शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्या नावास काळे फासले होते तर आज नाशिक मधील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन दादाजी भुसे व आ.सुहास कांदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर शेतकरी पाऊसाची चातका सारखी वाट पाहत असल्याने चिंतेत पडला आहे.शेतकऱ्यांची हि चिंता आता काहीसे मिटणार असून शेतकऱ्यांना आनंद होईल अशी बातमी हवामान तज्ञ पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे की रविवार ता.२६ जून पासून तर २९ जून २०२२  पर्यंत नदी ,नाले, ओढे वाहतील असा जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे.हा पाऊस महाराष्ट्रातील नाशिक,धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पडणार असून शेतकऱ्यानं साठी हा निर्णायक पाऊस असल्याचे पाटील यांनी सांगितले. दर वर्षी जून महिन्यात पाऊस पडला तर तो साधारणतः २० दिवस किंवा ३० दिवस गॅप घेत असे म्हणजे पाऊसच पडत नसे.परंतु ह्या वर्षी १० जुलै पर्यंत पाऊस सारखा पडणार. असून शेतकऱ्यांनी जेव्हा पाऊसाने उघडीप दिली तेव्हा शेतीची कामे उरकून घ्यावीत असेही पाटील यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना  सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.