
भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : परखड, निर्भिड बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१
धुळे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : धुळे जिल्ह्यात भ्रष्टचार बोकाळला की काय अशी शंका धुळे वासियांच्या मनात घर करून आहे. या ना त्या कारणाने धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोपान चांगलेच गाजते.काल साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार विनायक सखाराम थविल तर त्यांचे खाजगी पंटर संदीप मुसळे यांना धुळे येथील एसीबी ने कोठडीत डांबले.या कारवाईने साक्री तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे . याबाबत अँटी करप्शन ब्युरो धुळे यांचे कडून महाराष्ट्र न्यूज कडे मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार पिंपळनेर येथील रहिवासी असून त्यांनी मौजे ठोलीपाडा येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेतजमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला आहे.या शेतजमिनीवर भोगवटादार वर्ग १ होण्यासाठी शेतजमीन मालकाने २३ सप्टेंबर २०२१ रोजी अप्पर तहसीलदार विनायक थविल यांच्या कडे अर्ज केला होता. थविल यांनी ४ मे २०२२ रोजी या प्रकरणात ७/१२ उतारे व नोंदी सादर केल्या नसल्याचे कारण सांगत हे प्रकरण तूर्तास निकाली काढले असे सांगितले मात्र तक्रारदार यांनी या प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी सदर तहसीलदार थविल यांची भेट घेतली.यावेळी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्या साठी २५ हजार रुपयांची मागणी थविल यांनी तक्रारदार यांचे कडे केली होती तक्रारदाराने वेळ न घालवता थविल यांनाच घालविण्यासाठी धुळे अँटी करप्शन ब्युरो ( एसीबी ) कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ट्रॅप लावला मात्र थविल यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली त्यांनी ८ जून २०२२ रोजी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली नाही.परंतु एसीबी अधिकाऱ्यांना लाच मागणी अहवाल प्राप्त होताच अप्पर तहसीलदार थविल यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला म्हणून त्यांचे विरुद्ध भ्रष्टचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून खाजगी पंटर संदीप मुसळे यांचे सह थविल यांची रवानगी कोठडीत केली आहे. याबाबत अँटी करप्शन ब्युरो धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण,राजन कदम,शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलानेकर,गायत्री पाटील,भूषण शेरे,संदीप कदम,संतोष पावरा,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी कारवाई केली.
