ओझरच्या विश्वसत्य ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा निकाल १०० टक्के,सर्वच विद्यार्थ्यांच्या शिरपेचात यशस्वीेतेचा “सोनेरी”मुकुट ,शरयू पवार ह्या विद्यार्थिनीने ८९.६७ टक्के घेऊन उंचावली शान

0
75

प्रशांत पाठक ( प्रिन्सिपॉल )

भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा : मो.9158417131

ओझर ( मिग) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल अँड न्यूज पेपर नेटवर्क : उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑन लाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून नाशिक विभागाचा निकाल ९५.३ टक्के लागला आहे.मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर (मिग) येथील विश्वसत्य ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा निकाल  १०० टक्के लागल्याने कॉलेजचे चेअरमन व ओझर गावातील अनेक ग्रामस्थांनी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी ,तरुणांनी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पालकांनी विश्वसत्य ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य प्रशांत पाठक,सर्व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले आहे. तर अनेक वर्षांची परंपरा राखत ह्याही वर्षी मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.नाशिक विभागात ९६.१७ टक्के मुली तर ९४.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.विश्वसत्य जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स ची विद्यार्थिनी कु.शरयू भारत पवार हिने ८९.६७ टक्के मार्क्स घेऊन शान उंचावली आहे.तर सर्वच विद्यार्थ्यांच्या शिरपेचात यशस्वितेचा ” सोनेरी ” मुकुट कॉलेजचे प्रिन्सिपॉल सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका यांच्या मार्गर्शनाखाली व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे घातला गेल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी ,विद्यार्थिनी व प्राचार्य,प्राध्यापक, प्राध्यापिका यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे पाठीशी प्राचार्य व सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका यांचे पाठबळ मजबूत होते.सर्वच शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी , विद्यार्थिनी यांचेकडे वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यशस्वी करून उच्च शिखरास पोहचिण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली त्या मेहनती साठी तितकाच अभ्यासासाठी कस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लावला त्यामुळे १२ सायन्स मधील आजचा यशस्वी झालेला विद्यार्थी व विद्यार्थिनी स्व मेहनतीने जरी उत्तीर्ण झाले असतील परंतु त्याचे सर्व श्रेय प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका यांना जाते असे मत महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक ,संचालक भारत पवार यांनी व्यक्त करून प्राचार्य प्रशांत पाठक, प्रा.दिनेश अनारसे, प्रा.जीवन तडाखे, प्रा.राहुल गोर्डप्रा.शिवानी दूसाणे, प्रा.रफिक शेख, प्रा.सागर सूर्यवंशी, प्रा. वैशाली गोंधळे आदींचे अभिनंदन केले आहे.तर शरयू पवार ह्या विद्यार्थिनीचे प्राचार्य सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका यांनी अभिनंदन केले असून पवार हिचे महाराष्ट्र भरातून कौतुक व अभिनंदन चा वर्षाव व्हाट्सअप ,फेसबूक आणि मोबाईल द्वारे केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here