फुले माळवाडी म.फुले वि.वि.कार्यकारी सह.सोसा.चेअरमन पदी नामदेव जगदाळे
1 min read
भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

माळवाडी / देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : गंगाधर शेवाळे : नुकत्याच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील महात्मा फुले विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नामदेव गोविंदा जगदाळे यांनी तर व्हॉईस चेअरमन पदी कल्पनाताई शहाणा यांची निवड करण्यात आली.अत्यंत अटी तटीच्या निवडणुकीत पार पडलेल्या निवडणुकी कडे माळवाडी आणि फुले माळवाडी येथील जनतेचे लक्ष लागले होते.अनेक दिग्गज आपले नशीब आजमावण्यासाठी ह्या निवडणुकीत उभे होते.अनेकांनी तन, मन आणि धनाने सुद्धा नशीब आजमावण्यासाठी कंबर कसली होती.परंतु दिग्गजांना पराभवाचे धनी व्हावे लागले.नव्यानेच निवडून असलेले चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि सगळ्या सभासदांचे नेतृत्व घेऊन चालणारे असे आहेत .
आमच्या कारकीर्दीत सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून लहान मोठा हा भेदभाव मुळीच केला जाणार नाही असे ही चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
नवनियुक्त संचालक पुढील प्रमाणे