देवळा पोलीस इन्स्पेक्टर दिलीप लांडगे यांनी माहिती अधिकारात खोटी माहिती दिल्याने त्यांचे विरुद्ध अपर पोलीस अधीक्षक नाशिक यांचे कडे प्रथम अपील दाखल सुनावणी साठी मुख्य संपादक भारत पवार उपस्थित राहणार

0
46

            भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा.मो.9158417131

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज नेटवर्क  _ देवळा तालुक्यातील माळवाडी येथील गंगाधर दोधा शेवाळे यांनी सन २००८ साली येथील पोपट जयराम गोसावी यांचे कडून रीतसर जमीन खरेदी केली.जमिनी कडे येण्या जाण्या साठी रस्ता आहे अशी नोंद सुद्धा शासकीय दप्तरी आहे.परंतु मिथुन उर्फ यशवंत सुरेश गोसावी याने तो रस्ता वाल्मीक दोधु गोसावी यास सांगून नांगरून टाकल्याने सध्या रस्ताच नाही म्हणून कायद्यानुसार रस्ता मागणी करीता गंगाधर शेवाळे याने देवळा तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी सूर्यवंशी यांचे कडे तक्रार दाखल केली आहे.म्हणून त्याचा राग येऊन मिथुन उर्फ यशवंत गोसावी याने देवळा पोलीस ठाण्यात आमच्या समाधिंची विटंबना झाली असा खोटा तक्रार अर्ज देवळा पोलीस ठाण्यात दिला.याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र न्यूज पुढे सरसावले असून त्या खोट्या अर्जाची मागणी माहिती अधिकारातून शेवाळे यांनी केली असता देवळा पोलीस निरीक्षक तथा सहायक माहिती जन अधिकारी दिलीप लांडगे यांनी खोटी माहिती देऊन खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली.खोटी माहिती देणे हे कायद्याने कलम २११ नुसार गुन्हा असून तरीही लांडगे यांनी धाडस केल्याने त्या धाडसा विरोधात अपील दाखल केले होते.त्या अपिलाची सुनावणी आज शुक्रवार दि.१०/८/०२२ रोजी प्रथम अपील अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगने यांचे कडे असून सदर सुनावणीस जनमाहिती अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी ,कळवण अमोल गायकवाड, सहा.जनमाहिती अधिकारी तथा पोलीस निरीक्षक, देवळा दिलीप लांडगे तसेच प्रथम अपील दाखल करणारे गंगाधर शेवाळे यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यावेळी.महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक / संचालक भारत पवार उपस्थित राहणार असून शेवाळे यांची बाजू मांडणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here