जिल्हा परिषदेत भ्रष्टचार बोकाळला ,शाखा अभियंता घुगे यांचेवर एसीबी ने कारवाईचा फास आवळला…पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार फुटला
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा .मो.९१५८४१७१३१

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्हा परिषदेची अब्रु पुन्हा चव्हाट्यावर आल्याने काल दिवसभर चर्चेला उधाण आले होते.येथील पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार पाण्याच्या पाइपलाइन सारखा फुटल्याने शाखा अभियंता याच्या मुसक्या एसीबी स आवळाव्या लागल्याने यानिमित्ताने गेल्या वर्षभरापूर्वी झनकर यांनी शिक्षण विभागात सणसणीत भ्रष्टाचार केल्याची चर्चा सुद्धा चांगलीच रंगली होती.
नाशिक जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता अमोल खंडेराव घुगे (४३) रा. अशोका मार्ग,नाशिक यांनी दीड लाखाची लाच काल शुक्रवारी संध्याकाळी स्वीकारल्याने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) घुगे यांचेवर कारवाई चा फास आवळला त्यामुळे झेडपी पुन्हा भ्रष्टाचाराच्या चर्चेत अडकल्याने झेडपी ची इज्जत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेतील अनेक विभागांतर्गत अनेक ठिकाणी विविध विकास कामांचा धूमधडाका जोशात सुरू आहे.त्यापैकी सिन्नर येथे शासकीय ठेकेदार मार्फत पाथरे येथे नळ पाणीपुरवठा योजने चे काम पूर्ण झाले आहे.मात्र ठेकेदाराचे बिल अपूर्ण राहिले म्हणजेच बिल निघाले नसल्याने कामाचे बिल ४८ लाख रुपये मंजूर करून घेण्यासाठी चार टक्के प्रमाणे १ लाख ९० हजार रुपयांची मागणी घुगे यांनी ठेकेदार कडे केली. जि. प.च्या नवीन प्रशासकीय इमारतीत ही तडजोड मात्र दीड लाख रुपयांत ठरली.त्याप्रमाणे ह्या तडजोडीस काल शुक्रवारी अंतिम स्वरूप देत असताना एसीबी चे अधिकाऱ्यांनी घुगे यांना रंगे हाथ पकडुन कारवाई सुरू केली.रात्री उशिरा पर्यंत जि. प.मध्ये चौकशी सुरु होती. एसीबी चे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गर्शनाखाली कॉ.सुकदेव मुरकुटे ,मनोज पाटील यांनी त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.