काँग्रेसचे ग्रहण सुटता सुटेना..सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडी चे समन्स आलेना ! सोनिया हजर होणार पण राहुल ? काय म्हणतो …वाचा

0
55

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा : मो.9158417131

शिर्डी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर : नेटवर्क _ नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रा संबंधी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी व पक्षाचे खासदार असलेले राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालयाने (ईडी) समन्स बजावले असून सोनिया यांना ८ जून रोजी चौकशी कामी हजर राहण्याचे सांगितले आहे.अशी माहिती शिर्डी येथे काँग्रेसच्या नव संकल्प शिबिरात पत्रकारांशी बोलताना ना.बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.                         केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजपा करत आहे.देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढविणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केला आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडी ने दिलेली नोटीस ही लोकशाहची चिंता वाढवणारी आहे.संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहेत असे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.                    नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेली ईडी ची नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे.भाजपा सरकार कडून सातत्याने लोकशाहीवर आघात केला जात आहे हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही असे सांगत थोरात यांनी पुढे सांगितले की,याप्रकरणी संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीपणे उभी असून भाजपच्या दडपशाही मुळे देशातील जनते मध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झाला आहे.असे त्यांनी सांगितले.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रवक्ते अतुल लोंढे,डॉ.सचिन सावंत,आशिष दुवा आदी त्यांच्या समवेत उपस्थित होते.                                               सोनिया गांधी उपस्थित राहणार …पण राहुल काय म्हणतो ?                                                                राहुल गांधी सद्या देशात नसल्या कारणाने मला ५ जून नंतरची तारीख द्यावी असे राहुल यांनी ईडी ला कळवले आहे.मात्र ८ जून रोजी चौकशी साठी सोनिया गांधी उपस्थित राहतील असेही त्यांनी सांगितले.                                                       तपासाचा एक भाग म्हणून याप्रकरणी ईडी ने मल्लिकार्जुन खरगे व पवनकुमार बन्सल यांची अलीकडेच चौकशी केली गेली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here