June 27, 2022

मालेगाव आणि परिसरात पाऊसाची दमदार हजेरी

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

मालेगाव : क स मा दे टाइम्स : महारष्ट्र न्यूज : विश्वास सामुद्रे : जिल्ह्यात पाऊसाने हजेरी लावली असून पहिल्याच पाऊसाने मालेगाव,दाभाडी, आघार भागात संध्याकाळी पाऊसाने जोरदार आगमन केले.

याबाबत आमचे प्रतिनिधी विश्वास सामुद्रे यांनी याबाबत कळविले की मालेगाव आणि परिसरात संपूर्ण दिवसभर प्रचंड उकाडा वाढला होता संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक थंड वाटू लागले आणि लागलीच जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली.त्यामुळे आता तरी उकाड्याचे रूपांतर थंड ,गारव्यात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.मालेगाव आणि परिसरात पाऊसाची पहिलीच पण दमदार हजेरी लागल्याने अनेक तरुणांनी,वृद्ध व्यक्तीनी घरात बसूनच पाऊसाचा आनंद लुटला तर अनेक ठिकाणी बालकांनी नाचत गाणे म्हणत पाऊसाचे स्वागत केले.बराच वेळ चालणाऱ्या पाऊसाने मालेगाव मधील रस्ते,गटार पाऊसाच्या पण्याने न्हाऊन निघाले दाभाडी, आघार भागात पाऊसाने जोरदार आगमन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.