आज मध्यरात्री पासून तर १२ जून पर्यंत जमाव बंदी लागू
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.9158417131

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक मध्ये आज मध्यरात्री पासून तर येत्या १२ जून पर्यंत जमाव बंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
ज्ञानव्यापी आणि महादेव मंदिर वाद संदर्भात नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे आंदोलन ,मोर्चा,सभा,निदर्शने यांना बंदी घालण्यात आली आहे.वरील वादा संदर्भात शहरात आंदोलने किंवा मोर्चा ,निदर्शने होऊ शकतात त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून वेळीच हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच शहरात ठीक ठिकाणी नाका बंदी सुद्धा करण्यात आली आहे.