माळवाडी आणि फुले माळवाडी तील भूमी” पुण्य” झाली स्वामी अनेकरुपी यांच्या पदसपर्शाने,महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी : स्वामी अनेकरुपी महाराज

0
102

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : भारत पवार/ गंगाधर शेवाळे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी _ गुजरात येथील श्री भगवंत शिवतीर्थ नारेश्वर नागज्योतिर्लिंग देवस्थान तीर्थक्षेत्र बीलमाळ , तुलसिगड येथील मठाधिपती स्वामी “अनेकरुपी” महाराज यांचे माळवाडी गावी आगमन होताच हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्त जणांनी जोरदार व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत गेले.यावेळी फुले माळवाडी,माळवाडी गावातील सर्वच ग्रामस्थ,तरुण,महिला,तरुणी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.तर देवळा तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने भक्त जणांची उपस्थिती लाभली होती.गावातील महिलांनी रस्ते सडा घालून रांगोळीने सजविलेले होते.” न भूतो, न भविष्यती ” असा हा ” दुग्धशर्करा “योगाचा कार्यक्रम फुले माळवाडी,माळवाडी गावातील ग्रामस्थांनी घडून आणला.स्वामी अनेकरुपी महाराजांचे गावात आगमन होणे म्हणजे डोळ्यांचे “पारणे ” फिटले तर माळवाडी आणि फुले माळवाडी गावाची ” भूमी ” महाराजांच्या पद स्पर्शाने ” पुण्य “झाली असे अनेक भक्त जणांनी यावेळी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी आणि फुले माळवाडी गावातील महाराजांच्या शिष्य गणानी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी खूपच मेहनत घेतली. गुजरात येथील बीलमाळ येथून महाराजांचे माळवाडी गावात आगमन होताच बँड, ढोल, ताशांच्या गजरात अनेकरुपी महाराजांचे उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकरुपी महाराजांनी माळवाडी येथील महादेव मंदिरात जाऊन पूजाविधी करून श्री महादेवाच्या पिंडी चे दर्शन घेतले.त्यांचे सोबत कीर्तनकार संजय धोंडगे व गावातील ग्रामस्थ,शिष्यगण यांनी महारांचा सत्कार केला. फुले माळवाडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत महाराजांची रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भगवंताची प्राप्ती करून मानवी जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावायचे असेल तर मानवाने देवाचे नामस्मरण केलेच पाहिजे.भगवंताच्या नामा मुळे मानवाच्या जीवनात आनंद मिळतो.त्याची अंतरिमशक्ती जागरूक होऊन जगतउद्धरा साठी प्रेरणा मिळते.असे प्रतिपादन स्वामी अनेकरुपी महाराज यांनी यावेळी कार्यक्रमा प्रसंगी बोलताना सांगितले.महाराजांनी भक्त जणांना मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की,हिंदू संस्कृती महान आहे.महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे.भगवान शिव_ पार्वती यांनी सृष्टीची निर्मिती केली आहे कोणीही संपत्तीवर गर्व करू नये.सत्कर्म करून या जनमाचा उद्धार करावा. व्यसनांपासून दूर रहा असा संदेश यावेळी महाराजांनी उपस्थितांना दिला. अनेकरुपी महाराजांनी हजारो दारू पिणाऱ्या व्यसनाधीन असलेल्या लोकांची दारू सोडली असून आजही हे दारू सोडविण्याचे कार्य महाराज करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here