देवळा : भाग्यश्री पवार यांना राजकारणातील जिल्हास्तरीय पुरस्कार ,सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

0
50

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१                                              देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :  नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड, शाळेतील ऊपक्रमशील ऊपशिक्षिका व देवळ्याचे माजी ऊपनगराध्यक्ष श्री.अतुलभाऊ पवार यांच्या सौभाग्यवती सौ.भाग्यश्री अतुल पवार यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजकारण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन!
भाग्यश्री पवार मॅडम ह्या  जिजामाता माध्यमिक विद्यालयात पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाच चारपाच महिन्यापुर्वी पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत पवार मॅडम यांना महिला आरक्षणामुळे ऊमेदवारीची संधी चालून आली. त्यांचे यजमान श्री. अतुलभाऊ यांनी मागील पंचवार्षिक मध्ये ऊपनगराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली, त्यांनाही समाज कार्याची लहानपणापासून प्रचंड आवड. ह्या सर्व गोष्टी जुळून आल्यामुळे आमचे मार्गदर्शक,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्ष ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री.केदानाना आहेर यांनी आग्रह करून  पवार मॅडम यांना ऊमेदवारी दिली. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मॅडम ह्या प्रचंड व घवघवीत मताधिक्याने निवडून आल्या. माझ्या मते, जिल्ह्य़ातील एकमेव महिला नगरसेवक म्हणून सौ.भाग्यश्री पवार ह्याच असतील.
आपल्या नासिक जिल्ह्यातील शिक्षक नेते व एका दैनिकाचे  ऊपसंपादक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.के.के.आहिरे सर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष व माझे बंधुतुल्य वर्गमित्र साहेबराव कुटे, टिडीएफची मुलुखमैदान तोफ, गुगुळवाड ता.मालेगांव सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री.आर.डी. निकम व माझे मित्र भगूर नगर परिषदेचे नगरसेवक श्री. संग्रामभाऊ करंजकर आदिंच्या निवड समितीने आमच्या भाग्यश्री पवार मॅडम यांना पुरस्कार जाहीर केल्याबद्दल वरील मान्यवरांचे मनापासून कौतुक व धन्यवाद. माझ्यावर असेच प्रेम असु द्या.
सौ.भाग्यश्री पवार यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.केदानाना आहेर,आमच्या संस्थेच्या अध्यक्षा व लोहणेर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.धनश्रीताई आहेर ,देवळा नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ.भारतीताई अशोक आहेर,ऊपनगराध्यक्ष जितुआण्णा आहेर,देवळा परिसरातील ऊद्यमशील व्यक्तिमत्व व खुंटेवाडीचे उपसरपंच श्री.भाऊसाहेब पगार, श्री. शिवाजी मराठा हायस्कूलचे उपक्रमशिल शिक्षक श्री. एस. टी. पाटील सर व देवळा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आदि मित्रपरीवारांनी भाग्यश्री पवार यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नासिक जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने मी आपले आभार व्यक्त करतो व आपल्या ॠणात रहाण्याचे पसंत करतो. आमच्या जिजामाता परीवारावर असेच प्रेम रहावो, हिच भावना ऊरी बाळगतो. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here