देवळा : पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना कर्तव्याचे राहिले नाही भान , लोहोनर येथील बेकायदेशीर ” मटका ” काळा धंदा केला महान , कारवाईचे धाडस कुठे ठेवले गहाण ? आतातरी कर्तव्याचे येईल का हो भान ?_ सवाल

0
66

परखड निर्भिड सडेतोड लिखाण असलेल्या महाराष्ट्र न्यूज साठी जाहिराती आणि आपल्या परिसरातील बातम्या साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहोनेर गाव नेहमीच वाईट घटनांमुळे वेशीवर टांगले गेले आहे.कधी वाळू माफियांमुळे तर कधी प्रेयसीने आणि तिच्या घरच्यांनी मिळून लोहोनेर येथील हमरस्त्यावर जनतेसमोरच जाळून टाकने आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू होणे यांसारख्या ” वाईट ” घडामोडींमुळे वेशीवर टांगले गेले आहे. ” गाव तसे चांगले पण वेशीला … ” ह्या म्हणी प्रमाणे गावातील गोष्टी घडल्या मुळे  “लोहोनेर ” ह्या गावी अनेक सुज्ञ , कर्तव्य दक्ष नागरिक,अधिकारी यांचे लक्ष असणारच हे तितकेच खरे.म्हणून ह्या गावी ” पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी ” यांची विशेष मेहर नजर असणे साहजिकच आहे.परंतु घडते उलटेच पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची विशेष मेहरबानी ची नजर ” लोहोनेर ” गावात सुरू असलेल्या ” मटका काळया धंद्यावर …. हा धंदा गिरना नदीच्या आश्रयाला जोरदार आणि सर्रास पणे गेल्या ४/५ महिन्या पासून सुरू आहे .हे देवळा हद्दीत असलेल्या पोलीस स्टेशन अंतर्गत असून देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे आणि पोलीस कर्मचारी यांना का समजू नये ? का त्यांनी आपल्या कर्तव्याशी ” बेइमानी ” करावी ? का कर्तव्याचे ” भान ” विसराव ? हप्त्यासाठी च का ? असे नानाविध सवाल जनतेत चर्चिले जात आहेत.त्यामुळे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची प्रतिमा ” मलीन ” झाली आहे.हा मटका धंदा यास सरकारचे लायसन्स नसते आणि सर्रास पने गरीब आया _ बहिंनीच्या संसाराची लूट करणे म्हणजे किती पातक मटका चालविणारा आणि मटका चालू देणारा अधिकारी आपल्या डोक्यावर घेतो याची कल्पना वयाच्या ५५ वर्षाच्या पुढे येतेच ते असे सेवानिवृत्त झाल्यावर कोणाला अर्धांगवायु तर कोणास दुर्धर आजाराने पच्छाडलेले असते हे आपण पहातोच . एक मटका किंग तर आताच दुर्धर आजाराने पच्छाडलेला आहे त्यास मुंबई येथे उपचारार्थ जावे लागते.कारण गरीबांचा हा तळतळाट असतो.असो ते काही असो परंतु येवढे बिनधिक्कत मटका धंदा  सुरू असून लांडगे आणि पोलीस कर्मचारी यांनी ह्या धंद्यात सुरू ठेवण्याचा रस का ठेवला ? हाच प्रकार वासोळ ह्या गावी मटका धंदा बाभुळ बनात चालू असल्याचे समजते हे सुध्धा देवळा पोलीस ठाण्यात येते. गरीब बाया बापड्यांचा संसार उध्वस्त करून त्यांच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या मटका सटोड्यान वर कारवाई करण्याचे धाडस ह्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यात का नाही ? का यांच्या कर्तव्याला बट्टा लावतात ? हप्ता साठीच ना ? अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्याशी गद्दारी न करता ,आपले कर्तव्य गहाण न ठेवता कर्तव्यही प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले तर असेल फालतू मटका धंदा कधीच सुरू झाला नसता म्हणूनच कर्तव्यच गहाण ठेवून गद्दारी केल्याचे म्हंटले जाते आणि ते खरेच आहे.जर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्यात गद्दारी केली नसेल किंवा कर्तव्य गहाण ठेवले नसेल तर हा अवैध मटका धंदा ४/५ महिन्या पासून राजरोस सुरू का ? याचे उत्तर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे कडे आहे का ? असा सवाल येथील संतप्त नागरिकांनी केला आहे.ह्या वृत्ताची दखल घेऊन लोहोनेर येथील काळा मटका धंदा कायमचाच बंद करण्याचे धाडस पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आणि पोलीस कर्मचारी यांनी दाखवावे अशीही मागणी जनतेने केली आहे. येथील मटका धंध्या बाबत मागील ग्रामसभेत धंदा बंद करण्याचा ठराव सुध्दा करण्यात आल्याचे समजते.परंतु येथील सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यु.बी. खैरनार यांनी सुद्धा कर्तव्य खुंटीला टांगून धंदा बंद करण्यात धाडस केले नाही ही मोठी शोकांतिका असून ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे सुध्धा तीन तेरा वाजवता येतात हे खैरनार यांचे कडून पहावयास मिळते.

असाच अवैध मटका धंदा बागलाण अर्थात सटाणा तालुक्यात सुरू असून ह्या तालुक्यात अनेक ठिकाणी मटका किंग वाल्यांनी जोरदार बाळसे धरले आहे.मात्र सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी सुद्धा डोळेझाक केल्याने आता याकामी जिल्ह्याचे भूषण असलेले आणि जिल्ह्यास पाणीदार नेतृत्व लाभलेले जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव वरील अधिकाऱ्यांना करून देऊन अवैध मटका धंदा कायमचाच बंद होईल याकडे लक्ष घालावे अशी मागणी येथील हैराण झालेल्या नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here