
( केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर ,वरील छाया चित्र) भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि तुमच्या परिसरातील बातम्या साठी संपर्क : मो.9158417131
नवी दिल्ली : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : देशात २७ कीटकनाशक फवारणी औषधांवर बंदी घालण्याच्या तज्ञ समितीच्या शिफारशीवर केंद्रीय कृषी मंत्रालय ( Ministary of Agriculture ) या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या मुळे यावर तातडीने निर्णय होईल की नाही याबाबत उद्योग मंत्रालयातील तज्ञ शंका व्यक्त करत आहेत.बिझनेस लाईनने याबाबत वृत्त दिले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कीटनाशकांचा प्रस्तावित बंदिवरील ( Proposed Pesticide Ban) राजेंद्रन समितीच्या अहवालाबाबत कृषी मंत्रालय मंत्री स्तरीय चर्चा करू शकते.केंद्र सरकारने मे २०२० मध्ये एक अधिसूचना प्रकाशित केली होती.ज्या मध्ये २७ कीटनाशकांवर बंदी घालण्या बाबत संबंधितांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या परंतु भागधारकांनी केलेल्या विनंती वरून आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्तक्षेपामुळे हरकती आणि सूचना मागविण्याची मुदत ४५ दिवसां वरून ९० दिवसांपर्यंत वाढविण्यात आली होती त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक टी.पी.राजेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्रालयाने एका समितीची स्थापना करण्यात आली केंद्रीय कृषी सचिवांनी गेल्याच आठवड्यात पदभार स्वीकारला त्यामुळे त्यांना या विषयाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे दरम्यान कृषी मंत्रालयाने आतापर्यंत देशात आयात उत्पादन किंवा विक्रीसाठी ४६ कीटकनाशके आणि चार कीटकनाशकांच्या घरगुती वापरावर बंदी आहे.मात्र त्यांची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.आणि नऊ कीटकनाशके प्रतिबंधित वापराखाली आहेत.बंदी घालण्यात येणारी कीटकनाशके _ बेंप्यूरोकार्ब, अँसिफेट, ऍट्राझीन, ब्यूटाक्लोर, कॅप्टान, कार्बेन्डाझिम, कार्बोफ्युरॉन, क्लोरपायरिफॉस, डेल्टामेथ्रीन, डायकोफॉल ,डायमिथोएट, डायनोकॅप, डायूरॉन, म्यालाथिऑन, मॅन्कोझेब, मेथिमिल, मोनोक्रोटोफास, ऑक्सीफ्लूओरोफेन,पेंडीमेथालिन, क्विनॉलफॉस , सल्फक्योरॉन,थायोडीओकार्ब, थामोफँन्टेमीथाईल , थायरम, झिनवे आणि झायरम आदी कीटकनाशक औषधांवर बंदी घालण्यात येणार असल्याची शक्यता आहे. (* औषधांची नावे टायपिंग मिस्टेक असू शकते).
