कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक केली जाते तर नविन कामगार कायद्या मुळे कायम कामगार ही संकल्पना मोडीत निघणार _ डॉ.कराड

0
81

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१

पिंपरी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :  देशभरातील विविध कारखान्यांमध्ये तसेच विविध कंपन्यांमध्ये, सेवा संस्था मध्ये काम करणाऱ्या सर्व आस्थापनांमध्ये ७५ टक्के कामगार कर्मचारी सध्या कंत्राटी तत्वावर काम करत आहेत यात सरकारी,खासगी,निमसरकारी अशा सर्व आस्थापनांचा समावेश आहे कायम कामगार ही संकल्पना मोडीत काढण्या साठी केंद्र सरकारने प्रचलित कामगार कायद्यात बदल करून भांडवलदारां साठी नवीन कामगार कायदे करून त्यांना सर्व मार्ग मोकळा केला आहे.कंत्राटी कामगारां साठी महाराष्ट्रात कंत्राटी कामगार मंडळ ( कॉन्ट्रॅक्ट वर्क्स बोर्ड) स्थापन करावी अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती जेष्ठ कामगार नेते व सिटू युनियन चे प्रदेश अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे येथील पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम ,कामगार नेते अजित अभ्यंकर ,वसंत पवार,किरण मोघे,अनिल रोहम ,मोहन मोरे,डॉ. ज्ञानेश्वर मोरे ,मनोज पाटील,गणेश दराडे,चंद्रकांत तिवारी आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी डॉ.डी एल.कराड यांनी सांगितले की,कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक केली जाते.त्यामुळे त्या कंत्राटी कामगारांचे आर्थिक,सामाजिक, कौटुंबिक शौर्य धोक्यात येते या साठी त्या कामगारांना कंत्राटी कामगार मंडळा अंतर्गत नेमणूक करून त्यांना प्रॉव्हिडंट कायदा , ई. एस.आय.कायदा ग्रॅज्युएटी कायदा इ. सर्व कायद्यांचे लाभ मिळून देता येतील संबंधित वाचलेला पैशांचा लाभ कंत्राटी कामगारांना त्यांचे वाढीव वेतना मार्फत होईल असेही कराड यांनी सांगितले.

कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की कोणत्याही आस्थापनांमध्ये कंत्राटी कामगार नेमणूक करताना या कंत्राटी कामगार मंडळा मार्फत नेमले गेले पाहिजेत अशी तरतूद असणारा कायदा करण्याची गरज आहे. तर अजित अभ्यंकर म्हणाले की ,महाराष्ट्र मध्ये माथाडी कामगार मंडळाची स्थापना करून अशा प्रकारच्या प्रागतिक योजनेची पायाभरणी महाराष्ट्रात ५० वर्षांपूर्वीच झली आहे ती आजतागायत चालू आहे.कामगार संघटना संयुक्त कृती समिती संघटना महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारचे कंत्राटी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी मोठी चळवळ उभी करणार त्यासाठी प्रथम सरकारकडे शिष्टमंडळ आणि परिणामकारक मागणी सादर केली जाईल.त्यानंतर कायम कामगार आणि कंत्राटी कामगारांच्या एकजुटीची मोठी चळवळ उभी राहणार असेही अजित अभ्यंकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here