September 25, 2023

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे हिच खरी जयंती..!

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : संपर्क : मो.9158417131
पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मीडिया नेटवर्क : _
महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा कुणबी बहूजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरु केली आणि आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून मराठा बहूजन समाजाचा उदार केला महात्मा जोतिराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.त्यांची सहचारिणी पत्नी क्रांतीज्योती सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोबा नेवसे पाटील यांच्या कुळात झाला मनुवादी लोक अहंकारी तसेच प्रचंड धर्माभिमानी आहेत. यामुळेच मनुवादी लोक इतरांना शूद्र व तुच्छ लेखतो. तो विषमतेचे समर्थ करतो हे त्याचे अज्ञान आहे. त्यासाठी त्यांची माता जबाबदार आहे.परंतु वैदिक धर्मानुसार स्ञियांना शिक्षणाधिकार नाही. स्त्रियांना ज्ञानी केले पाहिजे.तरच मनुवादी लोक समाजातील माणसा सारखे वागू लागतील त्यांची मराठा बहूजनाप्रती असलेली व्देष भावना माता शिक्षित झाल्यास जळून जाईल..।

महात्मा फुले म्हणतात कि,ज्या ब्राम्हणांनी आपला अपमान केला त्यांच्या आई सुसंस्कृत असत्या तर असे प्रसंग घडले नसते.म्हणून भारता मध्ये देशामध्ये स्त्रियांनाच उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे.ही ज्योतिबाची धारणा होती. म्हणूनच त्यांनी पहिली शाळा स्त्रियांसाठीच काढली मराठा बहूजन समाजात जागृती निर्माण करुन अज्ञान व गरिबी दूरकरण्यासाठी जोतिबा सावित्रीमाई यांनी मोठी मोहीम हाती घेतली, सर्वप्रथम त्यांनी भारतीय लोकजीवनाचा अभ्यास केला भारतावर बळीराजा व छत्रपती शिवाजी महाराज या दोन राजांनी अत्यंत समता व समानतावादी राज्यकारभार केला हे अभ्यासले समतेचे प्रतिक सिंधुसंस्कृती आक्रमक आर्य मनुवादी लोकांनी बुडविली म्हणुनच जोतिबा मित्रासोबत इ.स. १८६९ मध्ये किल्ले रायगडावर गेले. शिवरायांची समाधी शोधून सफाई केली.जगात सर्वप्रथम जोतिबांनी शिवजयंती इ.स.१८६९ पासून सुरु केली,छत्रपती शिवाजी महाराजांनी “वैदिक राज्याभिषेक” नाकारुन २४ सप्टेंबर १६७४ रोजी “शिवधर्म पध्दतीने” ब्राम्हणाशिवाय मराठा बहूजनांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करवून घेतला होता…।

जोतिबा व सावित्री यांनी ग्रंथनिर्मिती केली.इ.स.१८६५ मध्ये नातू घराण्यातील एका ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवले.त्यास डाॕक्टर केले,त्यास वारसदार केले सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला.त्यांचे विधी दिले ओतूर च्या डुंबरे पाटलांकडे ब्राम्हणा शिवाय लग्न लावले.महात्मा फुले यांनी ब्राम्हणांना ठणकावून सांगितले होते कि,ब्राम्हणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून जोती म्हणे..।।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या छावणीत दि.१४ एप्रिल १८९१ रोजी झाला बाबासाहेब आंबेडकर यांना अनुभवातून अभ्यासातून फिरण्यातून संवादातून समाजातील विदारक चित्र दिसत होते.त्यांच्यासमोर अज्ञान गरिबी जातवाद धर्माधता हे प्रमुख शत्रू व त्यांनी घेरलेला बहूसंख्य समाज होता मनुष्यबळ अर्थबळ अज्ञान यांची कमतरता होती.मराठा बहूजन प्रबोधनासाठी वर्तमानपत्र सुरु केले “मूकनायक” सोबतच फिरुन लोकांना हक्क अधिकाराची जाणीव देऊ लागले बाबासाहेब आंबेडकर यांना अनुभवातून अभ्यासातून फिरण्यातून संवादातून समाजातील विदारक चित्र दिसत होते.त्यांच्यासमोर अज्ञान गरिबी जातवाद धर्माधता हे प्रमुख शत्रू व त्यांनी घेरलेला बहूसंख्य समाज होता मनुष्यबळ अर्थबळ अज्ञान यांची कमतरता होती.मराठा बहूजन प्रबोधनासाठी वर्तमानपत्र सुरु केले “मूकनायक” सोबतच फिरुन लोकांना हक्क अधिकाराची जाणीव देऊ लागले.सर्वच मराठा बहूजन समाजाचे सर्वागीण कल्याण व्हावे हीच भावना होती,परंतू स्पृश्य-अस्पृश्य वादाने ते शक्य झाले नाही.परिणामी आपले मानवतावादी हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक पातळीवर काम करण्यास सुरुवात केली.त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली..।

बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या अनुयायांनी जगाला कवटाळले आहे पण दूर्दैवाने अनेक शिकलेल्या लोकांनी मनुवादी विचारसरणीचे कर्मकांड अंधश्रद्धा परंपरा जोपासून २२ प्रतिज्ञांचा भंग केलेला आहे..या महामानवाचा जगातील पहिला पुतळा ९ डिसेंबर १९५४ रोजी मराठाबांधव भाई माधवराव बागलांनी कोल्हापूरात बसविला आहे.हे प्रेम हा जिव्हाळा हा आदर मराठा व इतर समाजांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे.यासाठी भीमाच्या लेकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून मराठ्यांना प्रकाशाकडे नेण्याची जबाबदारी स्वीकारावी बाबासाहेब याच आचरणाचे व विचारांचे स्वागत करत असत. आज बाबासाहेब असते तर या सामाजिक जाणिव प्रत्यक्षात आल्या असत्या. सामाजिक समतेच्या दिशेने जाणारे हे एक करुणेचे पाऊल आहे..

होय ज्या मनुस्मृती प्रमाणे शिवराज्याभिषेकाला विरोध केला होता,तीच मनुस्मृती जाळणाऱ्या आणि
जगातील एकमेव विश्वरत्न ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधल अशा पुस्तक प्रेमीची महामानवाची जयंती येतं आहे,ज्ञानाची भूक होती,नव्हती धनाची हाव,अरे लाखात एक होता माझा भीमराव.होय त्या महामानवाची जयंती येतेय,ज्यांनी तुम्हांला राजकीय
हिरो बणायचा अधिकार दिला…

कित्येक खर्च झाल्या लेखण्या इंथे, भीम शब्दांत बांधताना..तरी लिहितील अजून लाख पिढ्या इंथे भीम नव्याने शोधताना…तुम्ही आम्हा वाघासारखे जगायला शिकविलात, संविधान देऊन हाती,जयभीम बोलतांना आज ही आमची फुगते गर्वाने छाती.त्यामुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे हिच खरी जयंती असेल..।
लेखक _ ✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे – 9689446003
जिल्हाध्यक्ष पुणे
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.