बागलाण तालुक्यातील जीवघेणी गुन्हेगारी थोपवा, ठेंगोडा येथील दरोडा तपासातील गती वाढवा अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जा _ अमोल बच्छाव

0
83

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.9158417131

सटाणा (नाशिक) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घातक स्वरुपाच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
जातीय अत्याचार, महिला अत्याचार, दरोडा, चोरी आदी घटनांची संख्या तालुक्यात वाढली असून पोलीस प्रशासन नेमके करते काय ? हा विधायक प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.

तालुक्यातील गुन्हेगारीने आता टोक गाठले असून गेल्या आठ दिवसातच लागोपाठ दोन संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनांनी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन्ही संशयास्पद मृत्यूंमधील मृत व्यक्ती या आदिवासी समाजातील शेतमजुर (सालदार) असल्याने आदिवासी समाजावरील होणाऱ्या अत्याचारांप्रति शासन आणि पोलीस प्रशासन प्रचंड उदासीन असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये लखमापुर (बागलाण) गावातील काही लोकांनी केलेले अन्याय-अत्याचार, तळवाडे (मालेगांव) येथिल आदिवासी शेतमजुरांवर गावाने लादलेल्या जाचक अटींनी महाराष्ट्रभरात या तालुक्यांची प्रतिमा डागाळली असल्याने बागलाण तालुका, मालेगांव ग्रामीण उपविभाग पोलीस प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.                          तर तालुक्यातील ठेंगोडा येथील आदर्श सामाजिक नेते  अण्णा पगारे तथा सरपंच चिधाबई अण्णा पगारे यांचे घरी गेल्या १५ दिवसांपूर्वी दरोडा पडला असून रोख रकमेसह सोने चोरीस गेले आहे याची सटाणा पोलिसांनी चौकशी करून खातर जमा करून फिर्यादी दिनेश अण्णा पगारे यांनी फिर्याद देऊन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी पोलिसांना अद्याप मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर गावातील ग्रामस्थांनी पोलिसानं विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरोड्यातील तपासाची गती अधिकाऱ्यांनी वाढवावी आणि आरोपींना शक्य तितक्या लवकर गजाआड करून पगारे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात असून सटाणा पोलीस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. सुभाष अनमुलवार यांवर आहे. बागलाण तालुका हा मालेगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय (DySP-SDPO) अधिकारी श्री. पुष्कराज सुर्यवंशी यांच्या कार्यक्षेत्र हद्दीत येतो, हा विभाग अपर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत खांडवी यांच्या नियंत्रणाखाली असून जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदाची जबाबदारी श्री. सचिन पाटील यांच्यावर आहे.

या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी येथिल वाढत्या गुन्हेगारीकरणावर आळा घालावा अशी नागरीकांची रास्त अपेक्षा आहे.

वाढत्या चोरीच्या घटना, जातीय अत्याचार, घातपाताची वाढणारी संख्या यांमुळे पोलीस प्रशासनाची निष्क्रियता समोर आल्याने नाशिक परिक्षेत्राचे उप पोलिस महानिरिक्षकांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवीत तसेच, नाशिक ग्रामिणच्या पोलीस अधिक्षकांनीही अनु. जाती, अनु. जमाती यांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि असुरक्षितता संपविण्यासाठी योग्य कायदेशीर भूमिका घ्यायला अशी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता, आदिवासी मित्र प्रा. अमोल बच्छाव यांनी केली आहे.

गुन्हेगारीने नागरीकांमध्ये वाढलेल्या असुरक्षिततेच्या भावना थोपविण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने, झालेल्या संशयास्पद मृत्यूंसाखळीचा योग्य छडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे अमोल बच्छाव यांनी सांगीतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here