माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अंजनाबाई कुंवर यांची नियुक्ती
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.9158417131

माळवाडी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अंजनाबाई पर्वत कुंवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोटेशन पद्धती नुसार गेल्या दीड महिन्या पासून येथील ग्रामपंचायतीत उपसरपंच पद रिक्त झाले होते रोटेशन पद्धती नुसार आणि दिलेल्या शब्दा नुसार अनुसूचित जमातीच्या अंजनाबाई कुंवर यांनाच उपसरपंच पदी करावी अशी चर्चा ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत झाल्या मुळे सर्वानुमते कुंवर यांचे नाव ग्रामसेवक संभाजी देवरे यांचे कडे दिल्यामुळे आणि ठरलेल्या तारखेस अंजनाबाई कुंवर यांचाच एकमेव अर्ज सादर झाल्यामुळे कुंवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील कार्यकर्त्यांनी कुंवर यांचे अभिनंदन केले.अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांना प्राधान्य देऊन सर्वानुमते माझी बिनविरोध उपसरपंच पदी निवड केल्या बद्द्ल मी सगळ्यांचे आभारी आहे.असेही कुंवर यावेळी म्हणाल्या.